Mahakumbh 2025 : खुशखबर..! कुंभमेळ्यासाठी विमानसेवा स्वस्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 12:34 IST2025-02-01T12:32:59+5:302025-02-01T12:34:57+5:30
कुंभमेळ्यात बरेच लोक जात असल्याने आणि संपूर्ण उद्योग मागणीवर आधारित असल्याने भाडेवाढ झाली.

Mahakumbh 2025 : खुशखबर..! कुंभमेळ्यासाठी विमानसेवा स्वस्त
पुणे : प्रयागराज येथे सध्या कुंभमेळा सुरू असल्याने देशभरातून पर्यटक येथे येत आहेत. यासाठी पुण्यातूनही हजारो भाविक विमानाने जात आहेत. परंतु तिकीट दर जास्त असल्याने भाविक त्रस्त हाेते. या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यासोबत बैठक घेत तिकीट दरात नियंत्रण ठेवण्याच्या सूचना दिली आहे. त्यानुसार विमान कंपन्यांकडून तिकीट घरात ५० टक्के घट करण्यात आली आहे, अशी माहिती केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांनी दिली.
राममोहन नायडू म्हणाले, विमान कंपन्यांसोबत गुरुवारी आमची बैठक झाली. त्यावेळी त्यांनी मागणीवर आधारित विमानाचे दर वाढत असल्याचे सांगितले. कुंभमेळ्यात बरेच लोक जात असल्याने आणि संपूर्ण उद्योग मागणीवर आधारित असल्याने भाडेवाढ झाली. पण, आम्ही विमान कंपन्यांशी चर्चा केली आणि त्यांना हा विशेष प्रसंग मानण्यास सांगितले तसेच त्यांना तिकीट दर कमी करण्यास सांगितले आहे. याला विमान कंपनीकडून सहमती दर्शविली असून, तिकीट दर कमी केले आहेत. त्यामुळे प्रयागराजला जाणाऱ्या विमान तिकिटाचे दर ५० टक्क्यांनी कमी झाले आहे, असेही केंद्रीय मंत्री नायडू यांनी सांगितले.