MAHA TET Result 2024-2025 : टीईटी निकाल जाहीर..! तुमचे नाव यादीत आहे का ?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2025 12:57 IST2025-02-01T12:56:51+5:302025-02-01T12:57:22+5:30
'टीईटी’चा अंतरिम निकाल परिषदेच्या संकेतस्थळावर जाहीर; असा बघा निकाल

MAHA TET Result 2024-2025 : टीईटी निकाल जाहीर..! तुमचे नाव यादीत आहे का ?
पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेचा (टीईटी) अंतरिम निकाल परिषदेच्या संकेतस्थळावर शुक्रवारी (दि. ३१) सायंकाळी प्रसिद्ध करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल संकेतस्थळावर पाहता येणार आहे.
टीईटी परीक्षा राज्यात दि. १० नोव्हेंबरला राज्यातील विविध परीक्षा केंद्रांवर झाली. या परीक्षेसाठी ( पेपर १ आणि पेपर २) राज्यातील एकूण तीन लाख ५३ हजार उमेदवारांनी नोंदणी केली होती. या निकालाच्या अनुषंगाने गुणपडताळणी करायची असल्यास किंवा निकालाबाबत काही आक्षेप असल्यास, ते htpp:// mahatet.in या संकेतस्थळावर त्यांच्या लॉगइनमधून ६ फेब्रुवारीपर्यंत नोंदविता येणार आहे. अन्य मार्गाने आलेल्या अर्जांचा विचार केला जाणार नाही.
त्याचप्रमाणे उमेदवारांचे निकाल राखीव ठेवण्यात आल्यास, त्यांनीही आपले म्हणणे दि. ६ फेब्रुवारीपर्यंत mahatet24msce@gmail.com या ई-मेलवर पाठवावे. त्यानंतर आलेल्या निवेदनांचा विचार करण्यात येणार नसल्याचे परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी सांगितले. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, टीईटीचा अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल, असे सांगण्यात आले आहे.