‘मॅग्मो’ डॉक्टरांचा संप चिघळणार

By Admin | Updated: July 4, 2014 06:34 IST2014-07-04T06:34:02+5:302014-07-04T06:34:02+5:30

विविध प्रलंबित मागण्यांसाठी राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेतर्फे (मॅग्मो) पुकारण्यात आलेला डॉक्टरांचा संप चिघळण्याची शक्यता आहे

'Maggro' doctor will get annoyed | ‘मॅग्मो’ डॉक्टरांचा संप चिघळणार

‘मॅग्मो’ डॉक्टरांचा संप चिघळणार

पुणे : विविध प्रलंबित मागण्यांसाठी राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटनेतर्फे (मॅग्मो) पुकारण्यात आलेला डॉक्टरांचा संप चिघळण्याची शक्यता आहे. या संदर्भात सचिव स्तरावर आज झालेली चर्चा फिसकटली असून, राज्य सरकारने डॉक्टरांना मेस्मा (अत्यावश्यक सेवा देखभाल) कायदा लागू करण्याची तयारी केली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी दोन दिवसांत सामूहिक राजीनामे देऊन आंदोलन तीव्र करण्याचा पवित्रा घेतला आहे.
‘मॅग्मो’तर्फे राजपत्रित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी दोन दिवसांपासून आंदोलन सुरू आहे. २००९मधील सेवा समावेशनानंतर पूर्वलक्ष्यी लाभ देण्यात यावेत, डॉक्टरांना सेवेमध्ये कायम करण्यात यावे, केंद्र सरकारच्या पगारानुसार वेतन मिळावे, कामाचे तास निश्चित करण्यात यावेत यांसह डॉक्टरांच्या आणखी काही प्रलंबित मागण्या आहेत. या मागण्या मान्य करण्यासाठी मॅग्मोचे अधिकारी राजीनामे देण्याच्या तयारीत आहेत.
आतापर्यंत ६०० अधिकाऱ्यांनी संघटनेच्या अध्यक्षांकडे आपले राजीनामे सोपविले आहेत. आज या संदर्भात मॅग्मोचे अध्यक्ष राजेश गायकवाड, सचिव प्रमोद रक्षमवार आणि आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्यामध्ये चर्चा झाली. मात्र, चर्चेत कोणताही ठोस निर्णय झाला नाही. त्यामुळे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे.

Web Title: 'Maggro' doctor will get annoyed