शहरं
Join us  
Trending Stories
1
"मनी... मसल्स... महाराष्ट्र...; अदृश्य शक्तीमुळं नात्याला गालबोट लागलं"! काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
2
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
3
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
4
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
5
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
6
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
7
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
8
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
9
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
10
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
12
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
13
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
14
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
15
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
16
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
17
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
18
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
19
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
20
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट

'ती' आलिशान गाडी राष्ट्रवादी नेत्याची, नेली भाजप कार्यकर्त्याने, फिरवली गजानन मारणेने 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2021 8:33 PM

अटकेच्या भीतीने मारणे व त्याचे समर्थक फरार 

पुणे : कुख्यात गुंड गजानन मारणे याची तळोजा कारागृहातून सुटका झाल्यानंतर त्याची जंगी मिरवणुक काढण्यात आली. या मिरवणुकीत ज्या गाडीतून मारणे हात उंचावून लोकांना नमस्कार करत होता. ती गाडी पुरविणाऱ्याला कोथरुड पोलिसांनी अटक केली आहे. कोथरुड पोलिसांनी याप्रकरणात आतापर्यंत ७ गाड्या जप्त केल्या असून इतर गाड्यांचा शोध सुरु आहे.

गजानन मारणे याच्या मिरवणुकीसाठी वडगाव शेरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नारायण गलांडे यांची आलिशान गाडीत बसून गजानन मारणे याची मिरवणुक काढण्यात आली होती. ही माहिती मिळाल्यावर कोथरुड पोलिसांनी गलांडे यांनी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष राहुल दळवी यांनी ही गाडी आपल्याकडून कामासाठी मागून नेली होती. असा जबाब दिला. त्यानंतर राहुल दळवी यांना कोथरुड पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणात राहुल दळवी यांना अटक केली असून आतापर्यंत ७ गाड्या जप्त करण्यात आल्या असल्याचे कोथरुड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मेघश्याम डांगे यांनी सांगितले.

गजानन मारणे व त्याचे समर्थक हे अटकेच्या भितीने फरार झाले असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली. गजानन मारणे व त्याच्या समर्थकांवर एकूण ५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोथरुडमधील गुन्ह्यात त्यांना जामीन मिळाल्यानंतर वारजे पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात अटकेची टांगती तलवार मारणे टोळीवर होती. त्यामुळे ते सर्व जण फरार झाले आहेत. 

याबाबत पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, गुन्ह्यामध्ये पाहिजे असलेले आरोपी अटकेच्या भितीने फरार झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी वारजे माळवाडी पोलीस ठाणे, कोथरुड व गुन्हे शाखेची स्वतंत्र पथके तयार करण्यात आली आहेत. आरोपी ज्या ठिकाणी लपून बसले असतील, अशा ठिकाणी अचानक वेळी अवेळी छापामारी करण्यात येत असून सर्व आरांपीच्या घरझडत्या घेण्यात येत आहेत. तसेच तात्रिंक विश्लेषण पथकाच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला जात आहे. या आरोपींना आसरा देणारे तसेच या कृत्यास मदत करणाऱ्या लोकांची माहिती काढण्यात येत असून अशा लोकांवरही कडक कारवाई करण्यात येणार आहे. आरोपींच्या जंगम व स्थावर मालमत्ता बँक खाती यांची माहिती घेण्याचे काम सुरु झाले असून हे आरोपी मुदतीत मिळाले नाही तर या आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचे जाहीरनामे काढण्याची कार्यवाही सुरु करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.

ती गाडी राहुल दळवीला दिली होती..गजानन मारणे याच्या मिरवणुकीसाठी वापरण्यात आलेल्या गाडीचे मालक नारायण गलांडे यांनी सांगितले की, पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेला व आता भाजपमध्ये गेलेला राहुल दळवी याने आपल्याला गाडी हवी असल्याचे सांगितले. त्यामुळे खराडी येथे आपण ती त्याच्याकडे दिली. त्यानंतर त्याने तिचा वापर मिरवणुकीत केल्याचे आपल्याला माहिती नव्हते. कोथरुड पोलीस वडगाव शेरीत आले, तेव्हा आपल्याला ते समजले. 

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसfour wheelerफोर व्हीलर