LPG Gas Crisis : गॅस वितरणातील गोंधळ सुरूच; ९६ तासांचा नियम ठरतोय फोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 14:59 IST2026-04-12T14:59:02+5:302026-04-12T14:59:17+5:30

- बुकिंगनंतरही १०-१५ दिवस प्रतीक्षा करूनही मिळेना गॅस; एजन्सींची मनमानी, नागरिक संतप्त

LPG Gas Crisis Gas distribution chaos continues; 96-hour rule is becoming a failure | LPG Gas Crisis : गॅस वितरणातील गोंधळ सुरूच; ९६ तासांचा नियम ठरतोय फोल

LPG Gas Crisis : गॅस वितरणातील गोंधळ सुरूच; ९६ तासांचा नियम ठरतोय फोल

पिंपरी :पिंपरी-चिंचवड शहरातील घरगुती गॅस सिलिंडर वितरणात गोंधळ दिवसेंदिवस वाढत आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गॅस बुकिंग करूनही चार दिवसांत सिलिंडर मिळणे अपेक्षित असताना, १० ते १५ दिवस उलटूनही गॅस मिळत नसल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहेत.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी बुकिंगनंतर ९६ तासांत घरपोच सिलिंडर देणे बंधनकारक केले होते. ओटीपी प्रणालीद्वारेच वितरण करावे आणि थेट गोदामातून विक्री बंद करावी, असे आदेश देण्यात आले होते. मात्र, तरीही परिस्थितीत कोणताही बदल झालेला दिसत नाही. उलट एजन्सीकडून आदेशांकडे दुर्लक्ष होत आहे. चार दिवस सोडाच, दहा-पंधरा दिवस उलटूनही गॅस मिळत नाही. काही ठिकाणी ओटीपी मिळाल्यानंतरही सिलिंडर मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. एजन्सीकडून समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने नागरिक त्रस्त आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात लाखो गॅस ग्राहकांना ७५ हून अधिक एजन्सींमार्फत पुरवठा केला जातो. परंतु, अचूक आकडेवारीचा अभाव, नियोजनातील त्रुटी आणि देखरेखीतील कमतरता यामुळे वितरण व्यवस्था कोलमडल्याची टीका होत आहे. मागणीत वाढ झाल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळेच परिस्थिती गंभीर झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

गॅस न मिळाल्यामुळे अनेक कुटुंबांची गैरसोय होत आहे. काहींच्या घरात रुग्ण असतानाही गॅससाठी प्रतीक्षा करावी लागत असल्याने संताप वाढत आहे. प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून गॅस वितरण सुरळीत करावे, दोषी एजन्सींवर कठोर कारवाई करावी आणि ९६ तासांच्या नियमाचे काटेकोर पालन करावे, अशी मागणी आहे. 

बुकिंगनंतरही गॅस मिळत नसल्याच्या तक्रारी जास्त आहेत. गॅस वितरणाचा गोंधळ सुरूच आहे. तक्रार करूनही अधिकारी दखल घेत नाहीत. तपासणी पथके कुचकामी आहेत. अधिकारी आणि एजन्सीवाले यांच्यात साटेलोटे आहे. त्यामुळे आता आम्ही ग्राहक मंचाकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. - विनोद क्षीरसागर, अध्यक्ष, दक्ष नागरिक संघ, पुणे जिल्हा



तीस मार्चला गॅस बुकिंगचा ओटीपी मिळाला, बारा दिवस उलटूनही सिलिंडर मिळाला नाही. घरी दोन रुग्ण असल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. - राणी मांडगे, बालाजीनगर, भोसरी 

Web Title : एलपीजी संकट जारी: गैस वितरण में अराजकता; 96 घंटे का नियम विफल

Web Summary : पिंपरी-चिंचवड में गैस सिलेंडर वितरण में अराजकता जारी है। नियमों के बावजूद, देरी बनी हुई है, 96 घंटे से अधिक। नागरिक अनुत्तरदायी एजेंसियों पर निराशा व्यक्त करते हैं और नियम को लागू करने के लिए तत्काल प्रशासनिक हस्तक्षेप की मांग करते हैं।

Web Title : LPG Crisis Continues: Gas Distribution Chaos; 96-Hour Rule Fails

Web Summary : Pimpri-Chinchwad faces ongoing gas cylinder distribution chaos. Despite regulations, delays persist, exceeding 96 hours. Citizens express frustration over unresponsive agencies and demand immediate administrative intervention to enforce the rule.