LPG Gas Crisis : घरगुती वापराच्या एलपीजी गॅसला डायमिथाइल इथरचा पर्याय

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 12:37 IST2026-03-21T12:36:56+5:302026-03-21T12:37:47+5:30

डीएमई हे कृत्रिम (सिंथेटिक) इंधन असून पारंपरिक इंधनांच्या तुलनेत अनेक फायदे देते.

LPG Gas Crisis Dimethyl ether as an alternative to LPG gas for domestic use | LPG Gas Crisis : घरगुती वापराच्या एलपीजी गॅसला डायमिथाइल इथरचा पर्याय

LPG Gas Crisis : घरगुती वापराच्या एलपीजी गॅसला डायमिथाइल इथरचा पर्याय

औंध : घरगुती वापराच्या एलपीजी गॅसला डायमिथाइल इथर हा पर्यायी गॅस शोधण्यास राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेमधील शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे. आत्मनिर्भर भारतासाठी स्वच्छ ज्वलनक्षम इंधन ऊर्जा सुरक्षितता आज अत्यंत महत्त्वाची आणि तातडीची गरज बनली आहे.

भारतातील ८० टक्क्यांहून अधिक जीवाश्म इंधनाची गरज आयातीवर अवलंबून आहे. सध्याच्या जागतिक परिस्थितीत विविध भू-राजकीय अडथळ्यांमुळे या ऊर्जा पुरवठ्यावर धोका निर्माण झाला आहे.

ग्रामीण भागात पंतप्रधान उज्ज्वला योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन मिळालेल्या एलपीजीच्या किमतीत अलीकडील पुरवठा साखळीतील व्यत्ययांमुळे मोठी वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर एलपीजीला पर्याय म्हणून स्वदेशी, शाश्वत आणि पर्यावरणपूरक इंधनाचा शोध अत्यावश्यक ठरला आहे. डायमिथाइल इथर (डीएमई) हे असेच एक आशादायी इंधन असून ते स्वच्छ ज्वलनक्षम आहे आणि स्वयंपाक तसेच इतर क्षेत्रांत क्रांती घडवण्याची क्षमता त्यात आहे.
 
स्वच्छ ज्वलन आणि बहुउपयोगिता 

डीएमई हे कृत्रिम (सिंथेटिक) इंधन असून पारंपरिक इंधनांच्या तुलनेत अनेक फायदे देते. हे ज्वलनाच्या वेळी अत्यल्प नायट्रोजन प्रमाणात काजळी, ऑक्साइड्स, सल्फर ऑक्साइड्स आणि सूक्ष्मकण उत्सर्जित करते. तसेच याची उष्णताक्षमता पारंपरिक इंधनांच्या तोडीस तोड असल्यामुळे ते प्रभावी पर्याय ठरू शकते.

डीएमईचे एलपीजीमध्ये विविध प्रमाणात मिश्रण करता येते, ज्यामुळे भारताची एलपीजी आयातीवरील अवलंबित्व कमी होऊ शकते. भारतीय मानक ब्युरोने आयएस १८६९८:२०२४ या मानकाद्वारे घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक वापरासाठी एलपीजीमध्ये २० टक्क्यांपर्यंत डीएमई मिश्रणास मान्यता दिली आहे. विशेष म्हणजे, एलपीजीमध्ये ८ टक्क्यांपर्यंत डीएमई मिसळण्यासाठी सिलिंडर, गॅस्केट, रेग्युलेटर, होज किंवा बर्नरमध्ये कोणताही बदल करण्याची गरज नाही.  

Web Title : घरेलू उपयोग के लिए एलपीजी का विकल्प: डाइमिथाइल ईथर

Web Summary : वैज्ञानिकों ने एलपीजी के विकल्प के रूप में डाइमिथाइल ईथर (डीएमई) की खोज की है। डीएमई एक स्वच्छ, घरेलू स्तर पर उत्पादित और टिकाऊ ईंधन है, जो भारत की एलपीजी आयात पर निर्भरता को कम कर सकता है। एलपीजी में 20% तक डीएमई मिलाया जा सकता है।

Web Title : Dimethyl Ether: A Promising Alternative to LPG for Home Use

Web Summary : Scientists have found dimethyl ether (DME) as an alternative to LPG. DME is a clean-burning, domestically producible, and sustainable fuel that can reduce India's reliance on LPG imports. Up to 20% DME can be mixed with LPG, potentially revolutionizing cooking and other sectors.