एमपीएससीचा अभ्यास करताना जुळले प्रेम; लग्नाचे आमिष दाखवून केला अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2022 15:16 IST2022-11-07T15:16:10+5:302022-11-07T15:16:18+5:30

तरुणीला फसवणूक झाल्याचे लक्षात येताच केली पोलिसात तक्रार

Love met while studying MPSC Atrocized by showing the lure of marriage | एमपीएससीचा अभ्यास करताना जुळले प्रेम; लग्नाचे आमिष दाखवून केला अत्याचार

एमपीएससीचा अभ्यास करताना जुळले प्रेम; लग्नाचे आमिष दाखवून केला अत्याचार

पुणे : एमपीएससी परिक्षेच्या अभ्यास करीत असताना अभ्यासिकेत त्यांचे प्रेम जमले. त्याने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याबरोबर शारीरीक संबंध ठेवले. त्यानंतर तिने लग्नाबाबत विचारल्यावर तरुणीला मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी रुपेश राजाभाऊ व्हावळे (वय ३५, रा. परळी वैजनाथ) याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत एका ३१ वर्षाच्या तरुणीने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार कसबा पेठ, हॉटेल पदम येथे १० ऑगस्ट, १९ सप्टेबर आणि ५ नोव्हेबर २०२२ रोजी घडला.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी आणि आरोपी रुपेश हे एकाच अभ्यासिकेत एमपीएससीचा अभ्यास करायला येत होते. त्या ठिकाणी त्यांचे प्रेम जुळले. रुपेश याने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्याबरोबर शारीरीक संबंध ठेवले. त्यानंतर तिने शनिवारी त्याला लग्नाबाबत विचारणा केल्यावर त्याने तिला हाताने मारहाण करुन लग्नास नकार दिला. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिने फिर्याद दिली असून पोलीस उपनिरीक्षक दाढे तपास करीत आहेत.

Web Title: Love met while studying MPSC Atrocized by showing the lure of marriage