कोरोनात पती गमावला; दिरानेच विनयभंग केला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 11:10 IST2022-11-11T11:08:33+5:302022-11-11T11:10:16+5:30

दिराने दारू पिऊन येत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले...

Lost husband in Corona molested by husband brother pune latest crime news | कोरोनात पती गमावला; दिरानेच विनयभंग केला!

कोरोनात पती गमावला; दिरानेच विनयभंग केला!

पुणे : कोरोनाकाळात तिने आपला पती गमावला. एकाकी झालेल्या या महिलेला आणि तिच्या आई-वडिलांना अपमानित करून सासू सासऱ्यांनी तिच्या स्त्रीधनाचा अपहार केला, तर दिराने दारू पिऊन येत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून विनयभंग केला.

याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार गुजरातमधील बडोदा येथील मांजलपूरमध्ये घडला. याप्रकरणी एका ४५ वर्षांच्या महिलेने फिर्याद दिली आहे.

अधिक माहितीनुसार, फिर्यादी या बडोदा येथे असताना कोरोनात त्यांच्या पतीचे निधन झाले. सासू-सासऱ्यांनी संगनमत करून फिर्यादींच्या आई-वडिलांना वेळोवेळी शिवीगाळ केली. फिर्यादींना स्त्रीधन म्हणून मिळालेले १८ तोळे दागिने घेऊन त्याचा अपहार केला. त्यांचा दिराने दारू पिऊन येत फिर्यादीकडे घाणेरड्या नजरेने पाहून मानसिक व शारीरिक छळ केला. याला कंटाळून त्या माहेरी निघून आल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक कवटीवार तपास करीत आहेत.

Web Title: Lost husband in Corona molested by husband brother pune latest crime news