नियंत्रण सुटले; ट्रक थेट कात्रज घाटातील २०० फूट दरीत कोसळला; वाहनचालक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 18:08 IST2025-04-24T18:07:02+5:302025-04-24T18:08:36+5:30

अग्निशमन जवानांनी वाहनचालकास जखमी अवस्थेत बाहेर काढले असून पुढील उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे

Lost control Truck fell directly into a 200-foot gorge in Katraj Ghat Driver injured | नियंत्रण सुटले; ट्रक थेट कात्रज घाटातील २०० फूट दरीत कोसळला; वाहनचालक जखमी

नियंत्रण सुटले; ट्रक थेट कात्रज घाटातील २०० फूट दरीत कोसळला; वाहनचालक जखमी

कात्रज : काञज जुन्या बोगद्याच्या जवळ गुरुवारी दुपारी चारच्या वेळेस ट्रक चालवत असणारा चालक विकास बालाजी रसाळ (वय 32, रा. लातूर)  हा ट्रक कात्रज बोगद्याच्या बाजूने कात्रज कडे येताना ट्रक वरील ताबा सुटल्याने दरीमध्ये २०० फूट ट्रक कोसळल्याची घटना घडली. ट्रक दरीत कोसळल्याने वाहनचालक रसाळ यांना गंभीर दुखापत झालेली आहे. तसेच ट्रकचे देखील नुकसान झाले आहे.

या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व भारती विदयापीठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन जवानांनी वाहनचालकास जखमी अवस्थेत बाहेर काढले. पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णवाहिका मधून ससून रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी दिली. यावेळी कात्रज अग्निशमन दलाचे जवान तसेच सहा. पोलीस निरीक्षक समीर शेंडे उपस्थित होते.

Web Title: Lost control Truck fell directly into a 200-foot gorge in Katraj Ghat Driver injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.