शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

चळवळींमधील मोठा योद्धा गमावला

By admin | Updated: April 14, 2015 01:46 IST

ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. यशवंत सुमंत हे चांगल्या अर्थाने अस्वस्थ असलेला माणूस होता, विविध चळवळींमध्ये त्यांनी सहभागी होऊन चळवळींना विचार देण्याचे काम केले.

पुणे : ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. यशवंत सुमंत हे चांगल्या अर्थाने अस्वस्थ असलेला माणूस होता, विविध चळवळींमध्ये त्यांनी सहभागी होऊन चळवळींना विचार देण्याचे काम केले. त्यांच्या जाण्याने चळवळींमधील मोठा योद्धा गमावला असल्याची भावना सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये मान्यवरांनी सोमवारी व्यक्त केली.राज्यशास्त्र विभागाच्या वतीने डॉ. यशवंत सुमंत यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शोकसभा घेण्यात आली. प्रा. सुहास पळशीकर, साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ, स्त्री अभ्यास केंद्राच्या माजी संचालिका विद्युत भागवत, चळवळीतील कार्यकर्ते किशोर ढमाले, प्रतिमा परदेशी उपस्थित होते.सुहास पळशीकर म्हणाले, ‘‘प्रा. सुमंत आणि मी गेल्या ४० वर्षांपासूनचे सहकारी होतो. जून १९८९ मध्ये मी व यशवंत सुमंत राज्यशास्त्र विभागामध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झालो. प्रा. सुमंत यांच्यामध्ये एक चळवळवाला दडलेला होता. तो दर दशकामध्ये डोकं वर काढायचा.’’हर्ष जगताप म्हणाले, ‘‘नवमार्क्सवादी, नवआंबेडकरवादी, नवसमाजवादी यांनी संस्थात्मक राजकारणाचे खच्चीकरण केले. डॉ. सुमंत यांची चळवळींच्या सर्व प्रवाहांशी नाळ जुळलेली होती. ते नंतरच्या काळात गांधीवादाकडे झुकले, त्यांना धर्म घेऊन काही बोलायचे असल्यानेच त्यांनी गांधीवाद स्वीकारला असावा. विचावंत शिकवित असताना त्या विचारवंतांवर अन्याय होता कामा नये असे ते नेहमी बजावायचे.’’हणमंत फाटक म्हणाले, ‘‘सुमंत सरांच्या बोलण्यातून जगण्याची प्रेरणा ग्रामीण भागातून आलेल्या विद्यार्थ्यांना मिळायची. सरांचा तास ही साधना असायची. सरांचा विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यावसायिक कधीच नव्हता.’’(प्रतिनिधी)यशवंत सुमंत यांच्या नावाने पुरस्कार४डॉ. यशवंत सुमंत यांच्या नावाने पदवीदान समारंभात पुरस्कार सुरू व्हावा याबाबत प्रयत्न करण्यात येत असून, लवकरच त्याचा निर्णय घेतला जाणार आहे, अशी माहिती मानस, नीती व समाजविज्ञान विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. एकनाथ खांदवे यांनी दिली.