शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
3
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
4
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
5
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
6
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
7
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
8
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
9
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
10
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
11
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
12
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
13
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
14
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
15
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
16
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
17
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
18
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
19
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
20
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
Daily Top 2Weekly Top 5

वाकडेवाडीला पंचवीस लाखांची रोकड लुटली

By admin | Updated: August 10, 2015 02:42 IST

स्टील व्यापाऱ्यांकडून गोळा केलेली २५ लाखांची रोकड तरुणांवर हल्ला करून लुटण्यात आली. ही घटना वाकडेवाडी येथील भुयारी मार्गामध्ये शनिवारी रात्री आठच्या

पुणे : स्टील व्यापाऱ्यांकडून गोळा केलेली २५ लाखांची रोकड तरुणांवर हल्ला करून लुटण्यात आली. ही घटना वाकडेवाडी येथील भुयारी मार्गामध्ये शनिवारी रात्री आठच्या सुमारास घडली. या प्रकरणी खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या प्रकरणी प्रदीप रमाशंकर दुबे (वय २७, रा. कुरुळी, आळंदी फाटा, चाकण) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुबे मूळचे उत्तर प्रदेशातील अलाहाबाद जिल्ह्यामधील बंदुकापूर गावचे रहिवासी आहेत. ते चाकण येथील एसबीएम स्टील कंपनीमध्ये आठ वर्षांपासून सुपरवायझर म्हणून काम करतात. दुबे आणि झा फडके हौदाजवळ काकाजी यांना भेटले. त्यांच्याकडून १५ लाखांची रक्कम घेऊन ही सर्व रक्कम त्यांनी काळ्या रंगाच्या सॅकमध्ये ठेवली. त्यांनी पुन्हा शर्मा यांना फोन केला. व्यापाऱ्यांकडून मिळालेले २५ लाख रुपये घेऊन हे दोघेही मोटारसायकलवरून शनिवारवाडामार्गे शिवाजीनगर बस स्थानकासमोरून ते न. ता. वाडीमार्गे वाकडेवाडीच्या भुयारीमार्गामधून जात होते. साधारणपणे आठच्या सुमारास अचानक त्यांच्यासमोर एक मोटारसायकल येऊन थांबली. अचानक ब्रेक दाबल्यामुळे तोल जाऊन दुबे आणि झा खाली पडले. दोन मोटारसायकलवरून आलेल्या चार आरोपींनी दोघांनाही मारहाण करायला सुरुवात केली. तसेच दुबे यांच्या पाठीवरची सॅक हिसकवायला सुरुवात केली. दुबे यांनी सॅकचा पकडून ठेवलेला पट्टा त्यांच्या हातामध्ये राहिला. सॅक हाती लागताच आरोपी मोटारसायकलवरून खडकीच्या दिशेने पसार झाले. घटनेची माहिती मिळताच परिमंडळ चारचे उपायुक्त सुधीर हिरेमठ, सहायक आयुक्त स्वप्ना गोरे, वरिष्ठ निरीक्षक कमलाकर ताकवले, दरोडा प्रतिबंधक पथकाचे वरिष्ठ निरीक्षक जी. डी. पिंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. (प्रतिनिधी)