शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
5
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
6
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
7
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
8
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
9
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
10
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
11
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
12
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
13
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
14
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
15
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
16
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
17
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
18
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
19
काकडी फक्त सॅलड नाही, तर आहे 'सुपरफूड'; पण जास्त खाणं टाळा, अन्यथा होईल नुकसान
20
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत भर दिवसा लुबाडणूक

By admin | Updated: June 21, 2014 23:33 IST

दुचाकीवरून घरी जात असताना भामट्यांनी रस्त्यात अडवून 68 हजार रूपयांचा ऐवज लुबाडून नेल्याचा प्रकार आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला.

बारामती : दुचाकीवरून घरी जात असताना भामट्यांनी रस्त्यात अडवून 68 हजार रूपयांचा ऐवज   लुबाडून नेल्याचा प्रकार आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडला. डोळ्याच्या दवाखान्यात उपचार केल्यानंतर घरी जात असताना पल्सर गाडीवर आलेल्या भामटयांनी रस्त्यात अडवून त्यांच्याकडील दागिने, रोख रक्कम, मोबाईल आदी ऐवज नेला. बारामती एमआयडीसी आणि शहरातील व्हिल कॉलनी परिसरात घडलेल्या या दोन घटनांनी खळबळ उडाली
या प्रकरणी सुनील श्रीरंग मेरगळ (कौठडी, ता. दौंड) यांनी फिर्याद दिली. मेरगळ पत्नी माधुरी यांच्यासह पेन्सील चौकातून एमआयडीसी मार्गे साद्री अॅग्रो फार्म हाऊसच्या परिसरातून जात दुचाकी गाडीवरून जात होते. त्यांचा पाठलाग करीत  पल्सर गाडीवर आलेल्या दोघांनी त्यांना अडविले. चाकूचा धाक दाखविला, मारहाण केली. क्लजवायर तोडली. त्यांच्याकडील रोख रक्कम, मोबाईल, सोन्याचे दागिणो, रिंगा, आदी 68 हजार रूपयांचा ऐवज लुबाडून नेला. या प्रकरणी बारामती शहर पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. अधिक तपास बारामती शहर पोलिस करीत आहेत.
 
सोन्याची चेन हिसकावून नेली
पत्ता विचारण्याच्या बहाण्याने महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून नेल्याचा आज भर दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. भामटे दुचाकीवरून आले होते.  बारामती शहर पोलिस सुत्रंनी दिलेल्या माहितीनुसार स्मिता सुभाष ढवळीकर (रा. व्हील कॉलनी बारामती) या पायी जात असताना दुचाकीवरून आलेल्या भामटय़ांनी पत्ता विचारण्याचा बहाणा केला. त्यांच्या जवळ येऊन गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून पोबारा केला. ढवळीकर यांनी आरडा ओरडा केला. परंतू चोरटे दुचाकीवरून पसार झाले. ैअधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक भोसले करीत आहे.