शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

एक, दोन नाही तर सहा वेळा क्वारंटाइनचा अनुभव घेतलेला ' तो ' काय म्हणतो बघा....

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2020 1:17 PM

पुण्यातील रुग्णाने १९९८ पासून २००६ पर्यंत ६ वेळा घेतला अनुभव

ठळक मुद्देक्वारंटाइन रुग्ण आपले बांधवच, त्यांना गावांनी वाळीत टाकू नये

अमृत सहाणे-पुणे : क्वारंटाइन म्हणजे नेमकं काय? हा अनुभव पुण्यातील एका रुग्णाने १९९८ ते २००६ या काळात तब्बल ६ वेळा घेतला आहे. मुंबईतील टाटा हॉस्पिटलमधील रेडिएशन मेडिसिन सेंटरमध्ये झालेल्या उपचाराचा अनुभव रुग्णाने लोकमतकडे व्यक्त केला. तसेच क्वारंटाइन (विलगीकरण) रुग्ण आपले बांधवच आहेत, त्यांना गावांनी वाळीत टाकू नये, असे आवाहनही केले आहे.एका रुग्णाला १९९८ मध्ये गळ्याजवळ छोटीशी गाठ असल्याचे जाणवले. त्यांनी पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात सर्व तपासण्या केल्या. डॉक्टरांनी आॅपरेशन ठरवले.  कॅन्सरमधील एक प्रकार थायरॉईड असल्याचे निदान झाले. यावेळी ते १७ वर्षांचे होते. घरातील सर्वजण चिंतेत होते. डॉक्टरांनी पुढील उपचारासाठी मुंबईतील टाटा हॉस्पिटलमध्ये जावे लागेल आणि आयुष्यभर एक गोळी घ्यावी लागेल याची कल्पना दिली. रुग्णाने जिद्दीने होकार दिला आणि घरातील आई-वडिलांनी देखील मुंबईला जाण्याची तयारी केली.दरम्यान पुण्यातील आणखी एका डॉक्टरांचा सल्ला घेतला. त्यानंतर कमला नेहरू येथे दुसºयांदा छोटेसे आॅपरेशन झाले. सगळे अहवाल घेऊन ते मुंबईत नातेवाईंकाच्या घरी गेले. टाटा हॉस्पिटलमध्ये अ?ॅडमिट झाले. तेथे आॅपरेशन झाले. सगळ््या तपासण्या झाल्या. त्यानंतर रेडिएशन मेडिसिन सेंटरमध्ये औषध देऊन क्वारंटाइनसाठी चार ते पाच दिवस ठेवण्याचे निश्चित झाले. या वेळी काय काळजी घ्यावी, याची माहिती डॉक्टरांनी दिली. जून १९९८ ला पहिल्यांदा औषध दिल्यानंतर दोन रूममध्ये चौघांना क्वारंटाइन केले होते. औषध घेतल्यानंतर रूममध्ये जायचे, आत जाताना टॉवेल, ब्रश, पेस्ट, साबण एवढेच आत घेऊन जायचे. शरीरातील औषधाचे प्रमाण कमी होत नाही, तोपर्यंत रूममधून बाहेर काढत नव्हते. डॉक्टर दिवसातून दोन वेळा औषधाचे प्रमाण मशिनद्वारे तपासत होते.चार ते पाच दिवसांनी रूममधून बाहेर येताना अंघोळ करून बाहेर येणे सर्व कपडे साहित्य त्या रूममध्येच सोडणे नंतर परत दुसºया रूममध्ये आल्यावर अंघोळ करून मग बेडवर जावे लागत, असा हा संघर्ष सात वर्षे करावा लागला आहे. क्वारंटाइन असताना वॉर्डबॉय, मावशींपासून ते नर्स, डॉक्टर हे सर्व एका कुटुंबांप्रमाणे जपतात, काळजी घेतात. इतरांना संसर्ग होऊ नये, यासाठी क्वारंटाईन केले जाते. त्यात काळजी घेणे एवढेच अपेक्षित असते.

कोरोना संशयितांना वाळित टाकू नकाआता कोरोनाचे जे संकट जगावर आलेले आहे. यात आपल्या देशातील परदेशातून आलेल्या लोकांना होम क्वारंटाइनचे शिक्के मारले जात आहेत. अनेकांना क्वारंटाइन केले जात आहे. मात्र, क्वारंटाइन केलेले रुग्ण हे आपले बांधवच आहेत. त्यांना वाळीत न टाकता त्यांच्यापासून संसर्ग होणार नाही, एवढीच काळजी घ्यायला हवी. सरकारने वेळोवेळी केलेल्या सूचना आणि आदेशांचे पालन करून सर्वांनीच घरी थांबून स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी, असे आवाहन आता ठणठणीत बरे झालेल्या रुग्णाने केले आहे.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPoliceपोलिसhospitalहॉस्पिटलdoctorडॉक्टर