शहरं
Join us  
Trending Stories
1
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
3
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
4
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
5
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
6
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
7
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
8
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
9
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
10
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
11
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
12
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
13
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
14
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
15
‘अटक ते कटक’ नकाशावरून महाराष्ट्रात संताप का?; मराठा साम्राज्याचा नकाशाच केला गायब
16
देशाबाहेर जाणारा पैसा अडविण्याची हिंमत हवी! हा भारताच्या स्वयंनिर्भरतेच्या आत्म्यावरच आघात
17
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
18
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
19
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
20
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
Daily Top 2Weekly Top 5

लोकप्रतिनिधींवर करडी नजर

By admin | Updated: July 4, 2015 00:03 IST

जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांच्या बैैठकीनंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक घेऊन आता

बारामती : जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांच्या बैैठकीनंतर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची बैठक घेऊन आता कामकाजावर आपण लक्ष ठेवणार असल्याचे सूतोवाच केले आहे. बैठकीत त्यांनी विकासकामांचा दर्जा राखण्यासाठी ‘स्ट्रक्चरल आॅडिट’ करण्याच्या सूचनाही दिल्या. बारामती नगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांमधील अंतर्गत गटबाजी, मागील आठवड्यात विशेष सर्वसाधारण सभा काही मिनिटांत गुंडाळण्याच्या प्रकाराची त्यांनी दखल घेतली. शहरातील भूमिगत वीजवाहिन्यांचे काम निकृष्ट दर्जाचे झाले आहे, असे पवार यांच्या निदर्शनास आणण्यात आले. त्यांनी तत्काळ त्याची दखल घेऊन बारामती महावितरणचे परिमंडल मुख्य अभियंता रामराव मुंडे यांना या कामाची माहिती घेण्याचे आदेश दिले. बारामती शहरातील गणेश मंडईचे काम सध्या सुरू आहे. या कामामुळे रिंगरोडलगत तात्पुरती मंडई सुरू करण्यात आली आहे. बारामती शहराचा विस्तार वाढला आहे. त्यामुळे तातडीने बाजार समिती आवार, सूर्यनगरी भागात मंडई सुरू करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्याचबरोबर एकाच ठिकाणी गर्दी होत असल्यामुळे भविष्यात आणखी चार ते पाच ठिकाणी मंडई सुरू कराव्यात, असे त्यांनी सांगितले. त्यामध्ये कसबा, पाटस रोड, जळोची, तांदूळवाडी आदी भागांत त्याचे नियोजन करावे, असे सांगितले. पालखी सोहळ्यासाठी राज्य शासनाने २ कोटी रुपये नगरपालिकेला मंजूर केले आहेत. त्याचा खर्च सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत करायचा आहे. त्यावर स्वतंत्र मीटिंग आयोजित करण्यात आली आहे. मात्र, विशेष सर्वसाधारण सभेतच या विषयाला मंजुरी दिल्याचे दाखविण्यात आले होते. याबाबत काही नगरसेवकांनी अजित पवार यांना पत्राद्वारे कळविले होते. त्यावर पवार यांनी एकहाती सत्ता असतानादेखील असे प्रकार होता कामा नयेत, असे सांगितले. शहरातील विविध विकासकामांचा आढावा त्यांनी घेतला. रेल्वे उड्डाणपूल १५ आॅगस्टपर्यंत सुरू होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. पालिकेतील गटबाजीमुळे पवार यांनी नगरसेवकांची बैठक घेतली. एकत्रित काम करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. (प्रतिनिधी)बारामती शहरातील विकासकामांच्या आढाव्याबरोबरच शहरातील पत्रकार, डॉक्टर, वकील, सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वृक्षारोपणाची मोहीम जोरात हाती घ्यावी, असे अजित पवार यांनी सांगितले आहे. त्यानुसार पालखी सोहळ्याच्या आढाव्याची बैठक झाल्यानंतर सामाजिक संस्थांचा सहभाग वाढविण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून नियोजन करण्यात येणार आहे.- सुभाष सोमाणी, नगराध्यक्ष, बारामती