हडपसरमध्ये येत्या रविवारी रंगणार लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट...!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2025 12:45 IST2025-10-12T12:41:34+5:302025-10-12T12:45:55+5:30
- 19 ऑक्टोबर रोजी पहाटे साडेपाच वाजता तुपे ऑडिटोरियम मध्ये रंगणार पहाट....

हडपसरमध्ये येत्या रविवारी रंगणार लोकमत स्वरचैतन्य दिवाळी पहाट...!!
पुणे : दिवाळी म्हणजे केवळ प्रकाशाचा, उत्सवाचा किंवा फराळाचा सोहळा नाही, तर ती आपल्या संस्कृतीतील एक गूढ, पवित्र आणि संवेदनशील जाणीव आहे. हीच दिवाळी जेव्हा पहाटेच्या नीरव शांततेत संगीताच्या सुरांनी सजते, तेव्हा ती एक सांस्कृतिक अनुभूती देणारी पर्वणीच ठरते. हडपसरमध्ये ‘लोकमत’ आयोजित आणि पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत ‘स्वरचैतन्य’ दिवाळी पहाट हे यंदाचं असंच एक अनुभव संपन्न पर्व ठरणार आहे.
पं. रघुनंदन पणशीकर यांचं शास्त्रीय गाणं, सावनी शेंडे यांची भक्तिरसपूर्ण प्रस्तुती, आर्या आंबेकरचा आधुनिक सूर आणि रमाकांत गायकवाड यांचं भावपूर्ण गायन हे सारे मिळून शास्त्रीय, नाट्यसंगीत, भक्तीसंगीत आणि आधुनिक संगीताचा संगम रसिकांसाठी पर्वणी ठरणारा आहे. रविवार (दि.१९) रोजी पहाटे ५:३० वाजता, विठ्ठल तुपे पाटील ऑडिटोरियम, हडपसर येथे या संगीत सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
सुरांच्या या अद्वितीय लहरीत पारंपरिक दिवाळीची ऊब, शास्त्रीय रागांची गोडी आणि भक्तीचे पवित्र स्वर एकत्र मिसळतील. या दिग्गज कलाकारांना साथसंगत करणार आहेत कीबोर्ड आणि संगीतसंयोजन अनय गाडगीळ, तबला आदित्य आठल्ये, बासरी सुनील अवचट, हार्मोनियम आदिती गराडे, तालवाद्य उद्धव कुभांर, वेस्टर्न पर्कशनिस्ट अभय इंगळे, पखवाज विनीत तिकोणकर, सितार कल्याणी देशपांडे आणि गिटार तन्मय पवार.
पुण्यातील रसिकांसाठी दिवाळी पहाट हा केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नाही, तर संस्कृती आणि अध्यात्माचा उत्सव आहे. वर्षभराच्या गोंधळातून निवांत, सुरेल पहाट अनुभवण्याचा हा क्षण असंख्य संगीतप्रेमींच्या मनात दरवर्षी नवा उत्साह निर्माण करतो. यंदाची हडपसरमधील ‘स्वरचैतन्य’ दिवाळी पहाट ही त्याच उत्साहाला नवा रंग देणारी ठरणार आहे. सुरांनी सजलेली, भक्तीच्या सुवासाने दरवळलेली आणि आधुनिकतेच्या झंकाराने उजळलेली ! या कार्यक्रमाचे सहयोगी प्रायोजक सुहाना मसाले, चंदूकाका सराफ, लोकमान्य मल्टिपर्पज को ऑप. सोसायटी, काका हलवाई स्वीट सेंटर असून सहप्रायोजक मनोहर सुगंधी, शुभम ग्रुप ऑफ कंपनीज, आर्ट इंडिया आऊटडोर पार्टनर आहेत, डीओओएच पार्टनर ओडोन्मो असून कम्युनिटी पार्टनर घे भरारी आहे आणि लोकमत सखी हे फोरम पार्टनर आहेत. तर कार्यक्रमाचे निवेदन ओंकार दीक्षित करतील.
रविवार, १९ ऑक्टोबर २०२५
वेळ : पहाटे ५:३० वा.
स्थळ : विठ्ठल तुपे पाटील ऑडिटोरियम, हडपसर.
विनामूल्य प्रवेशिका पुढील केंद्रावर उपलब्ध
काका हलवाई स्वीट सेंटर : आर्यन सेंटर, ॲक्सिस बँकेजवळ • चंदन नगर, बी. आर. टी. बस स्टॉपजवळ, बापूसाहेब पठारे नगर, नगर रोड. • केशव नगर, केशव कुंज, ओल्ड ऑर्बिस शाळेसमोर • मुक्ता ॲड्स : ऑ. नं. २४, भोसले ऑर्केड, वैभव सिनेमा शेजारी, हडपसर • चंदूकाका सराफ : मगरपट्टा सिटी मेन गेटसमोर, हडपसर • लोकमान्य मल्टिपर्पज को ऑपरेटिव्ह सोसायटी : शॉप नं. १, रामकृष्ण प्लाझा, पुणे सोलापूर रोड, प्रणाम हॉटेल शेजारी, हडपसर • युनिट नं. ३ आणि ४, तळमजला, फन आणि शॉप, काका हलवाई शेजारी, सोलापूर रोड, फातिमा नगर • शांतिनिकेतन, शॉप नं. ६, तळमजला, बी बिल्डिंग, मगरपट्टा सिटी रोड, मगरपट्टा • लोकमत कार्यालय : लॉ कॉलेज रस्ता.