- सलीम शेख शिवणे : पुण्यात गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) व्हायरसने थैमान मांडले आहे, त्याचे प्रमुख कारण हे दूषित पाणी सांगितले जाते. पिण्याचा पाण्याचा मूसू सोर्स अर्थात खडकवासलाधरण यातूनच हा प्रकार झाल्याचे समोर येत आहे. एकीकडे सोर्स शोधला जात असताना दुसरीकडे खडकवासलाधरणाच्या पाण्यातच बेकायदेशीरपणे पोल्ट्री फार्मपासून हॉटेल उभे आहेत, त्यांचे शेकडो लिटर सांडपाणी दररोज राजरोस धरणाच्या बॅकवाटॅरमध्ये सोडले जात आहे. त्याकडे प्रशासन ‘अर्थ’पूर्ण दुर्लक्ष करत आहे.पुणे शहराला पिण्याच्या पाण्याची सोय करणाऱ्या खडकवासला धरणाच्या पाण्याच्या स्वच्छतेचा प्रश्न उभा राहिला आहे. खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणात फार्म हाऊस, मोठे हॉटेल, रेस्टॉरंट बांधण्यात आले आहेत. ज्यामधून सांडपाणी धरणात सोडण्यात येत असल्याच्या तक्रारी आहेत. संपूर्ण शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या धरणाची निगा राखण्यात प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याचे दिसत आहे.
पाण्यामध्ये सांडपाणी सोडणे गुन्हा आहेच, शिवाय येथील पाणीही थेट उपसणे गुन्हा आहे. असे प्रकार शोधून काढण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली समिती नेमण्यात आली आहे. त्या समितीच्या माध्यमातून यापुढे कारवाई करण्यात येणार आहे. - श्वेता कुऱ्हाडे, अभियंता, जलसंपदा विभाग खडकवासलाच्या बॅक वॉटरमध्ये वेंकटेश्वर पोल्ट्रीचे केमिकल मिश्रित घाण पाणी सोडले जाते. तसेच मोठ्या सोसायटी, हाॅटेल, फार्म हाऊस, डीआयटीसारख्या संस्थेचे ड्रेनेज पाणी कोणत्याही प्रकिया न करता थेट धरणात सोडून दिले जाते. गावामध्ये जिल्हा परिषद माध्यमातून या ठिकाणी एसडीपी प्लांट उभारणे आवश्यक आहे. - विजय मते,अध्यक्ष खडकवासला मतदारसंघ, मनसे