शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
Sangli: प्रकाश शेंडगेंच्या मोटारीला चपलांचा हार, काळे फासले, धमकीचे पत्रही लावले
6
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
7
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
8
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
9
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
10
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
11
भाजपा आमदाराच्या गाडीवर अज्ञातांकडून हल्ला, दगडफेकीत समोरील काच फुटली
12
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
13
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
14
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
15
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
16
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
17
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
18
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
19
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा

लोकसभा निवडणूक निकाल २०१९ : शिरूरचा गड अमोल कोल्हेंनी जिकला...!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2019 10:38 PM

आतापर्यंत तीनदा विजय मिळवत हॅट्रिक साधलेल्या आढळरावांचा पराभव करत अमोल कोल्हे शिरूर मध्ये जायंट किलर ठरले आहे

शिरूरः शिवसेनेचे खासदार असलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आतापर्यंत तीनदा विजय मिळवत शिरूरला हॅट्रिक साधली होती. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुचर्चित उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना उमेदवारी देत राष्ट्रवादी काँग्रेसने काही करून हाशिरूर मतदारसंघ जिंकायचाच असा निर्धार करत कोल्हेंसाठी अपार मेहनत घेतली होती. या मेहनतही काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांपासून ते कार्यकर्त्यापर्यंत अशा सगळ्यांच्या जोरदार तयारीवर विद्यमान खासदारशिवाजीराव आढळराव पाटील यांचा ५८,४८३ मतांनी पराभव करत शिरूरचा गड जिंकला.. शिवाजीराव हे  कोल्हे यांना पराभूत करून ते विजयाचा चौकार मारणार का याबाबतच सगळीकडे उत्सुकता आहे. आढळराव पाटील यांनी सलग 15 वर्ष या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केल्यामुळे त्यांनी यावेळी पुन्हा एकदा जोर लावला आहे. स्थानिक उमेदवारांना संधी देऊनही यश न मिळाल्याने राष्ट्रवादीने यंदा शिवसेनेतून आयात केलेले अभिनेते अमोल कोल्हे यांना संधी दिली आहे. कोल्हे यांनाही तरुण आणि महिला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला असून, इथे अटीतटीची लढत बघायला मिळाली होती. लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली तसेच सर्वच फेऱ्यांमध्ये डॉ. अमोल कोल्हे यांनी आघाडी घेतली..त्यांना या निवडणुकीत शिरूरमध्ये  ६,३५,८३० मतं मिळाली असून शिवाजीराव आढळराव यांच्या पारड्यात ५, ७७, ३४७ मतं पडली आहेत. 2014 साली राष्ट्रवादी काँग्रेसने प्रतिष्ठेची लढत करून एकत्रित ताकद लावूनही शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव यांनी सलग विजय मिळवित हॅटट्रिक साधली होती.  आढळराव यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे देवदत्त निकम यांच्यावर तब्बल ३ लाख 1 हजार 453 मतांनी विजय मिळविला होता. आढळराव यांना 6, 42, 828 तर देवदत्त निकम यांना 3, 41, 375 मते मिळाली होती. शिवसेनेतून ऐन वेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाऊन लढणारे अशोक खांडेभराड यांना केवळ 36, 431 मते तर आम आदमी पक्षाचे सोपानराव निकम यांना 16, 653 मते मिळाली होती.  11 हजार 971 मतदारांनी नकाराधिकार (नोटा) वापरला होता.

टॅग्स :Shirurशिरुरshirur-pcशिरूरDr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेShivajirao Adhalraoशिवाजीराव आढळरावShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस