प्रार्थनेसाठी घर लॉक करून गेले; कुलूप तोडून चोरटयांनी लाखोंचे दागिने पळवले
By नम्रता फडणीस | Updated: March 12, 2024 15:59 IST2024-03-12T15:59:25+5:302024-03-12T15:59:50+5:30
वानवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

प्रार्थनेसाठी घर लॉक करून गेले; कुलूप तोडून चोरटयांनी लाखोंचे दागिने पळवले
पुणे: वानवडी परिसरात बंद घराचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत तिजोरीमधून पावणे तीन लाखांचे दागिने आणि रोकड असा ऐवज चोरटयांनी लंपास केला. या प्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि. १० मार्च रोजी दुपारी ३. ते सव्वा सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
याप्रकरणी एका ६४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला त्यांच्या पतीसमवेत प्रार्थना करण्यासाठी घर लॉक करून गेल्या होत्या. या दरम्यान अज्ञात चोरटयांनी घराचे कुलूप तोडून आता प्रवेश केला आणि लोखंडी कपाटातील रक्कम आणि तिजोरी कशाच्या तरी साहाय्याने उघडून २ लाख ८७ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. पोलीस उपनिरीक्षक सोनावणे पुढील तपास करीत आहेत.