शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
रिलायन्सचा मोठा धमाका! अंबानींनी खरेदी केली प्रियांका चोप्राची कंपनी अन् तिलाच बनवलं 'बॉस'; संपूर्ण कंट्रोल कुणाकडे राहणार?
5
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
6
Bhuvneshwar Kumar: बुमराहपेक्षा भारी ठरला भुवी! असा पराक्रम करणारा पहिला भारतीय जलदगती गोलंदाज
7
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
8
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
9
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
10
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
11
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
12
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
13
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
14
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
15
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
16
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
17
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
18
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
19
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
20
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

Local Body Election: भोर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रणसंग्रामात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची एन्ट्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 11:23 IST

सन १८८५ साली ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या १४० वर्षे पूर्ण झालेल्या झालेल्या भोर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यामध्ये नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदासाठी सरळ लढत होत आहे.

- सूर्यकांत किंद्रे भोर : भोर नगरपालिकेच्या निवडणुकीचे वातावरण चांगले तापले असून निवडणुकीच्या रणसंग्रामात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांच्याही सभांचे नियोजन केल्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे. सन १८८५ साली ब्रिटिश काळात स्थापन झालेल्या १४० वर्षे पूर्ण झालेल्या झालेल्या भोर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यामध्ये नगराध्यक्षपदासह नगरसेवकपदासाठी सरळ लढत होत आहे.

सहा ठिकाणी अपक्ष दोन ठिकाणी शिवसेना एक ठिकाणी काँग्रेस आपले नशीब आजमावत आहेत. मात्र, मुख्य लढत भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशीच होत आहे. निवडणुकीच्या प्रचाराच्या अंतिम टप्प्यात प्रचार शिगेला पोहोचला असताना संत गाडगे महाराज प्राथमिक शाळा मैदान येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ३० नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजता तर जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल येथे दुपारी दीड वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची एक डिसेंबरला भोरमध्ये जाहीर सभा होणार असून निवडणुकीतील रंगत अजून वाढणार आहे.

दरम्यान, भोर शहरातील पिण्याचे पाणी, सार्वजनिक शौचालय, स्ट्रीटलाइट, खेळाचे मैदान, सांस्कृतिक भवन, क्रीडा संकुल, आरोग्य व स्वच्छता, बालोद्यान वॉकिंग ट्रॅक या प्रश्नांसह सुशिक्षित बेरोजगार तरुणांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल उत्रोली वडगाव औद्योगिक वसाहतीचा प्रश्न ही मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. महायुती सरकारमध्ये एकत्र काम करणारे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार भोर नगरपालिकेच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढत आहेत.

दोन्ही पक्षांकडून फडणवीस व पवार यांच्या सभांचे नियोजन केल्यामुळे जाहीर सभेत मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री एकमेकांच्या विरोधात टीका करणार करणार का? एकमेकांना क्लीन चिट देणार, यामुळे दोघांच्याही सभांकडे भोर शहरातील मतदारांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सभांमुळे भोर शहरातील निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापले आहे. दोन्ही पक्षांकडून विजयासाठी जोर लावला असून आपणच कसा भोरचा विकास करू शकतो हे प्रचाराच्या माध्यमातून सांगितले जात आहे.

भोर नगरपालिकेची स्थापना ब्रिटिश काळात १८८५ साली झाली. नगरपालिकेला १४० वर्षे पूर्ण झाली असून त्या काळातील नगरपालिकेची इमारत अद्यापही अत्यंत सुस्थितीत आहे. भोर शहरामध्ये माजी नगराध्यक्ष कै. अमृतलाल रावळ हे १९६९ साली पहिल्यांदा नगराध्यक्ष झाले. १९९३ पर्यंत ते चार वेळा नगराध्यक्ष होते.या काळात उस्मान शेख, बा. सी. बापट, डॉ. प्रदीप पाटील यांचा नगराध्यक्षपदाचा काही काळ अपवाद वगळता २४ वर्षे भोर शहरावर रावळ यांची एक हाती सत्ता होती. १९९३ साली सुधीर खाटपे काँग्रेसचे नगराध्यक्ष झाले आणि नगरपालिकेत काँग्रेसची सत्ता आली. त्यानंतर एक दोन अपवाद वगळता काँग्रेसकडे सत्ता राहिली.

गीतांजली शेटे, कल्पना किरवे, शोभा भोंडवे, चंद्रकांत सागळे यांनी नगराध्यक्षपद भूषवले. २००८ साली राष्ट्रवादीची सत्ता आली. विठ्ठल शिंदे नगराध्यक्ष झाले. २०११ साली काँग्रेसकडे सत्ता आली आणि सचिन हर्णसकर तृप्ती किरवे, दीपाली शेटे, तानाजी तारू जयश्री शिंदे, निर्मला आवारे हे नगराध्यक्ष झाले. मागील १७ वर्षे नगरपालिकेवर माजी आमदार संग्राम थोपटे यांची एक हाती सत्ता आहे. 

मुख्यमंत्री प्रथमच भोर नगरपालिकेच्या प्रचारात -

भोर नगरपालिकेच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार एक दोन वेळा आले होते. विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना आले होते, मात्र मुख्यमंत्री प्रथमच भोर नगरपालिकेच्या प्रचारामध्ये येत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Chief Minister and Deputy Chief Minister enter Bhor election battle.

Web Summary : Bhor municipal elections heat up with rallies by Fadnavis and Pawar. BJP and NCP face a direct fight for power. Key issues include water, sanitation, and industrial development. All eyes are on the leaders' speeches.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूकLocal Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकZilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूकPMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२५