शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पुरंदर विमानतळाच्या भूसंपादनासाठी कर्ज घ्यावे लागणार, फेब्रुवारीअखेर निधी मिळणार - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 21:07 IST

भूसंपादनासाठी ५ हजार कोटी रुपयांवरून आता ६ हजार कोटी खर्च येणार आहे, त्यामुळे राज्य सरकारने कर्ज उभारण्याचा निर्णय घेतला आहे

पुणे : पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भूसंपादनासाठी आवश्यक असणारा निधी उभारण्यासाठी कर्ज घेण्यात येणार आहे. त्याचा सविस्तर प्रस्ताव पुढील आठवड्यात अर्थात १० फेब्रुवारी रोजी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांना दिले. भविष्यातील पुणे शहराची गरज लक्षात घेऊन पुरंदरविमानतळाची निर्मिती करावी तसेच विमानतळ परिसराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी सिडकोलाही निर्देश देण्यात आले आहेत.

पुरंदर विमानतळाबाबत वर्षा निवासस्थानी आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य सचिव राजेश अग्रवाल, अपर मुख्य सचिव (वित्त) ओ. पी. गुप्ता, अपर मुख्य सचिव (परिवहन) संजय सेठी, प्रधान सचिव (उद्योग) पी. अन्बळगन, मुख्यमंत्री यांचे गुंतवणूक सल्लागार कौस्तुभ धवसे, महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारसू तसेच दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी उपस्थित होते.

पुरंदर तालुक्यातील सात गावांमध्ये हे विमानतळ होणार असून यासाठी सुमारे ३ हजार एकर जमिनी संपादित करण्यात येणार आहे. यासाठी प्रति एकरी एक कोटी रुपयांहून अधिक दर देण्याचे ठरले असून चार पट मोबदला व दहा टक्के जमीन परतावा देण्याचे राज्य सरकारने यापूर्वीच मान्य केले आहे. गेल्या महिन्यात जमिनीचा एकरी दर तसेच परताव्यापोटी देण्यात येणारी दहा टक्क्यांऐवजी वाढीव जमीन देण्यास राज्य सरकार तयार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांशी बोलताना स्पष्ट केले होते. त्यामुळे या भूसंपादनासाठी जिल्हा प्रशासनाने पूर्वी ५ हजार कोटी रुपयांचा निधी लागेल, असा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला होता. त्यानंतर या घोषणेनंतर आता हा खर्च एक हजार कोटी रुपयांनी वाढून ६ हजार कोटी रुपये झाला आहे. यासाठी राज्य सरकारने कर्ज उभारण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भातील प्रस्ताव राज्य मंत्रिमंडळाने मान्य केल्यानंतर हुडकोकडे पाठविण्यात येणार आहे.

फडणवीस म्हणाले, “भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी एमआयडीसीला हुडकोकडून कर्ज घ्यावे लागणार आहे. त्यासाठीचा सविस्तर प्रस्ताव तयार करावा. याबाबत मुख्य सचिवांनी संबंधितांशी चर्चा करून हा प्रस्ताव तयार करावा. पुढील मंत्रिमंडळ बैठकीत (१० फेब्रुवारी) हा प्रस्ताव सादर करण्यात यावा. पुरंदर विमानतळाचा परिसर आता झपाट्याने विकसित होणार आहे. हा विकास परिसर म्हणून गणला जाणार आहे. त्याची अनियंत्रित वाढ होऊ नये यासाठी आतापासूनच नियोजन करावे. यासाठी सिडकोने पुढाकार घ्यावा. हे नियोजन नवी मुंबईसारखे असावे.”

मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्तावाला मान्यता दिल्यानंतर फेब्रुवारीअखेरपर्यंत हा निधी जिल्हा प्रशासनाला उपलब्ध होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील आठवडाभरात शेतकऱ्यांना मोबदल्याचे वाटप करण्यात येऊ शकते. त्यानंतर भूसंपादन पूर्ण करण्यात येऊन एप्रिलच्या मध्यापासून विमानतळाच्या प्रत्यक्ष कामाला सुरुवात होऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Loan for Purandar Airport Land Acquisition, Funds by February End

Web Summary : Devendra Fadnavis directs loan proposal for Purandar airport land acquisition. The proposal will be submitted to the cabinet on February 10th. The government plans to distribute compensation by February end, potentially starting work in April.
टॅग्स :PuneपुणेAirportविमानतळDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसcollectorजिल्हाधिकारीPurandarपुरंदरFarmerशेतकरीMONEYपैसा