शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
3
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
4
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
5
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
6
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
7
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ पदार्थांची बाजी
8
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
9
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
10
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
11
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
12
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
13
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
14
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
15
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
16
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
17
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
18
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
19
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
20
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
Daily Top 2Weekly Top 5

यशस्वी विद्यार्थ्यांच्या यादीमध्ये होतोय घोळ

By admin | Updated: April 16, 2017 04:01 IST

लोकसेवा आयोग, राज्य सेवा आयोग आदी स्पर्धा परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर क्लासेसच्या यशस्वी ठरलेल्या शेकडो विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली जाते.

पुणे : लोकसेवा आयोग, राज्य सेवा आयोग आदी स्पर्धा परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर क्लासेसच्या यशस्वी ठरलेल्या शेकडो विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली जाते. शेवटच्या टप्प्यात केवळ मुलाखतीचा डेमो देण्यासाठी गेलेल्या विद्यार्थ्यांचेही नाव आमचा यशस्वी विद्यार्थी म्हणून झळकविले जाते, त्यातून क्लासच्या यशस्वी विद्यार्थ्यांची यादी फुगवली जाते. मात्र या बनवेगिरीचा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर मोठा परिणाम होतो, क्लास लावल्याशिवाय यश मिळत नाही अशी मानसिकता यातून निर्माण होते.स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्याकडे मागील वर्षात विद्यार्थ्यांचा कल मोठयाप्रमाणात वाढला आहे. विशेषत: पुण्यामध्ये स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. विद्यार्थ्यांचा हा वाढता कल पाहून स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करणारे शेकडो क्लासेस पुण्यामध्ये सुरू झाले आहेत. लोकसेवा आयोग, राज्यसेवा आयोग यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर क्लासेसचे मार्गदर्शन घेऊन यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांची भलीमोठी यादी जाहीर केली जाते. या यादीने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचे डोळे दिपून जातात. प्रत्यक्षात मात्र ही यादी अशीच फुगलेली असते. यातील अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या स्वयं अध्ययनाच्या जोरावर यश मिळवलेले असते, मात्र ते यश क्लासमुळे मिळाले अशी जाहिरातबाजी केली जाते. क्लासेसचे यशस्वी विद्यार्थी म्हणून जाहीर होणाऱ्या यादीचे निरीक्षण केले असता एकच विद्यार्थी अनेक क्लासेसच्या यादीमध्ये झळकताना दिसून येतो. अनेक विद्यार्थी अकरावी-बारावीपासूनच स्पर्धा परीक्षांचा नियोजनबध्द अभ्यास करतात. काही पहिल्याच प्रयत्नात तर काही अनेक प्रयत्नांनंतर पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा उत्तीर्ण होतात. यावेळी मुलाखतीचा एकच टप्पा त्यांना पार करायचा असतो. हाताशी आलेले यश निसटू नये यासाठी ते वेगवेगळया क्लासमध्ये जाऊन मुलाखतीचा डेमो देतात. केवळ अर्धा तासाचा हा डेमो देऊन मुलाखत कशी द्यावी याचे मार्गदर्शन घेतले जाते. अधिकारी बनण्याच्या शेवटच्या टप्प्यात पोहचलेल्या विद्यार्थ्यांने क्लासमध्ये येऊन केवळ डेमो दिला, एवढयावरूनही तो विद्यार्थी आमच्याच क्लासमुळे अधिकारी बनला असा प्रचार क्लासवाल्यांकडून केला जातो. त्यातून त्यांच्या यशस्वी विद्यार्थ्यांची यादी फुगली जाते.त्यामुळे क्लासेसच्या अवाढव्य फि बरोबरच त्यांच्याकडून केल्या फसव्या प्रचारावरही शासनाने नियंत्रण ठेवण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात आहे. (प्रतिनिधी)भांडवल न गुंतविता मोठा नफास्पर्धा परीक्षांचे क्लासेस हे कोचिंग देणारे केंद्र न राहता कार्पोरेट बिझनेट बनला आहे. एका क्लासच्या वर्षाच्या टर्नओव्हरने कोटयावधी पल्ला कधीच पार केला आहे. क्लासेसला शिक्षकांचा पगार वगळता कोणतेही भांडवल गुंतवावे लागत नाही. त्यामुळे विना भांडवला, बक्कळ नफा मिळविण्याचा क्लासेस हा किफायतशीर व्यवसाय बनला आहे. काही क्लासेसने विद्यार्थ्यांना पॅकेजची माहिती विशिष्ट टार्गेट पूर्ण करण्यासाठी एमबीए झालेल्या स्मार्ट तरूणांची नियुक्ती केली आहे. त्यामुळे क्लासेसला कार्पोरेट बिझनेसचे स्वरूप प्राप्त झाले आहे.