शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

पातळी खालावली

By admin | Updated: July 9, 2015 02:05 IST

भीमा नदीपात्रातील पाणीपातळी खोलवर गेल्याने शेतकरीवर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे.

देऊळगावराजे : येथील भीमा नदीपात्रातील पाणीपातळी खोलवर गेल्याने शेतकरीवर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे.ऐन पावसाळ्याच्या कालावधीत जून व जुलै या महिन्यांमध्ये पावसाने ओढ दिल्याने भीमा नदीपात्रातील पाणीपातळी खोलवर गेली आहे. शेतकऱ्यांच्या विद्युत पपांना पाणी पुरत नसल्याने खर्च करून पाईप व केबल वायर वाढविण्याची वेळ आली आहे. ऐन पावसाळ्यात भीमा नदीची पाणीपातळी खोलवर गेल्यामुळे सध्याचा ऊसलागवडीचा हंगाम असतानाही शेतकरी ऊसलागवड करण्यास तयार नाही. कारण, लागवड करीत असताना शेतीचा मशागत खर्च, बेणे खर्च, मजूर खर्च हा अवाचा सवा होत आहे. दुसरीकडे, पाण्याची समस्या निर्माण झाल्यामुळे ऊसलागवड करावी तरीही अडचण व न करावी तरीही अडचण, अशा दुहेरी चिंतेत शेतकरीवर्ग अडकला आहे. कारखान्यांनी शासनाच्या धोरणाप्रमाणे एफआरपीची रक्कम अद्यापही शेतकऱ्यांना दिलेली नाही; त्यामुळे शेतकऱ्यांनी काढलेले पीककर्ज भरण्याची ३० जूनची तारीख उलटून गेली. मात्र, पीककर्ज फेडणे शेतकऱ्यांना शक्य झाले नाही. एकीकडे उसाची बिले वेळेवर मिळत नाहीत. पाणीप्रश्न, विजेचा प्रश्न या सर्व बाबींमुळे शेतकरी अडचणीत आला आहे. परिणामी, कर्जमाफीची मागणी शेतकरीवर्गातून पुढे आली आहे. (वार्ताहर)पावसाने दडी मारल्याने बोअरवेलचा आधार> राजेगाव : पावसाने ओढ दिल्याने राजेगाव (ता. दौंड) परिसरात बोअरवेल (कूपनलिका) घेण्याचे काम सुरू झाले आहे. दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील काळेवाडी, ज्योतिबानगर, मलठण, वाटलूज, नायगाव आणि राजेगावच्या काही भागांत जून महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. ४समाधानकारक पाऊस झाल्यामुळे बाजरी, मका, कडवळ ही खरिपातील पिके घेण्याचा निर्णय त्याने घेतला. योग्य वापसा आल्यानंतर त्याने पेरणीही करून घेतली. परंतु, आज परंतु आज महिना होत आला तरी पावसाने पाठ फिरवल्याने आता दुबार पेरणी करावी लागते कि काय या विवंचनेत बळीराजा पडला आहे. > आठवडाभरात पाऊस झाला नाही, तर अंकुरलेली पिके हातची जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने त्याने पावसाचा धावा करण्यास सुरुवात केली आहे. मेघराजाने आपली वक्रदृष्टी कायम ठेवली, तर खरीप हंगाम धोक्यात येऊन चारा आणि पाण्याचाही प्रश्न गंभीर बनण्याची शक्यता आहे. ४दौंड तालुक्यातील खानवटे, राजेगाव, नायगाव, वाटलूज, मलठण, हिंगणीबेर्र्डी ही गावे उजनी धरणा तील पाणलोट क्षेत्रातील भागात येत असल्याने या भागातील शेतकरी ऊस हे पीक प्रामुख्याने घेत असतो. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत ऊस लागवडही भरपूर केल्या आहेत. या भागात कमी पाऊस झाला, तरी खडकवासला धरण साखळी परिसरात भरपूर पाऊस पडून एकदा उजनी धरण भरले की या भागातील शेतकरी निवांत होतो.