शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

दाखला हवाय.. शाळेची सायकल परत द्या

By admin | Updated: June 28, 2015 00:35 IST

साहित्य खरेदीतील गैरव्यवहार, आजी-माजी अध्यक्षांचे लाचखोरी प्रकरण या मुळे महापालिकेचे शिक्षण मंडळ चर्चेत असतानाच; आता पालिकेची शाळा

पुणे : साहित्य खरेदीतील गैरव्यवहार, आजी-माजी अध्यक्षांचे लाचखोरी प्रकरण या मुळे महापालिकेचे शिक्षण मंडळ चर्चेत असतानाच; आता पालिकेची शाळा सोडून इतर खासगी शाळेत प्रवेश घेतला म्हणून, विद्यार्थिनीला देण्यात आलेली सायकल परत मागण्याचा धक्कादायक प्रकार महापालिकेच्या वडगावशेरी येथील आनंदॠषी शाळेत घडला आहे. विशेष म्हणजे या सायकली राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्ताने वाटलेल्या असल्याने त्याचा शाळेशी काहीही संबंध नसताना , शाळेकडून या विद्यार्थिनीला दाखला देण्यासाठी सायकल परत मागण्यात आली. शिवानी संतोष देवदास असे या विद्यार्थिनीचे नाव आहे.शिवानी ही वडगावशेरीतील राष्ट्रसंत आचार्य आनंदॠषीजी महाराज प्राथमिक विद्यालयात शिक्षण घेत होती. या वर्षी ती चांगल्या गुणांनी सातवी पास झाल्याने तसेच या शाळेत आठवीचे वर्ग नसल्याने, तिचे वडील संतोष देवदास यांनी शिवानीचे नाव याच परिसरात असलेल्या लोणकर माध्यमिक विद्यालयात घातले. दरम्यान, शाळा सुरू होण्याच्या दिवशी म्हणजे, १५ जून रोजी शिवानीच्या वर्गशिक्षिकांचा फोन तिच्या वडिलांना आला. तुमच्या मुलीचे शैक्षणिक साहित्य द्यायचे असल्याने तिला शाळेत घेऊन या,असे सांगण्यात आले. या वेळी संतोष यांनी शिवानीचा प्रवेश दुसऱ्या शाळेत घेतला असल्याचे सांगितले. त्यानंतर शाळेकडे तिच्या दाखल्याची मागणी केली. त्यानंतर आठ दिवसांनी शाळेकडून संतोष यांना फोन करून दाखला हवा असेल, तर आधी सायकल जमा करा, असे सांगत, तिच्या वडिलांनाच फैलावर घेतले. त्यानंतर देवदास यांनी मुख्याध्यापिकांशी संपर्क साधला असता, देवदास यांचीच कानउघाडणी करण्यात आली. त्यामुळे शिवानीच्या पालकांना धक्काच बसला.कोणाची सायकल... जोर कोणाचा ?राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ७३व्या वाढदिवसानिमित्ताने शरद कला आणि क्रीडा प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षण मंडळाच्या शाळांमधील ७३ गुणवंतांना या सायकली वाटण्यात आल्या होत्या. त्यात एक सायकल शिवानीलाही मिळालेली होती. त्यामुळे खासगी संस्थेकडून मिळालेली सायकल शिक्षण मंडळ कसे मागते, याबाबत शिवानीच्या पालकांनाही धक्का बसला. ही सायकल मिळून दोन वर्षे झाली असताना, ती आता दाखल्यासाठी का परत मागत आहेत. या प्रश्नाने शिवानीचे पालकही चक्रावून गेले होते. शाळांचा पट वाढविण्यासाठी उद्योग ?-शिवानीची सायकल परत मागण्यामागे शाळेचा पट वाढविण्याचा प्रकार असल्याचे यावरून निदर्शनास येत आहे. या शाळेत मुलांची संख्या कमी असतानाही, लोक प्रतिनिधींच्या आग्रहास्तव या शैक्षणिक वर्षापासून या शाळेत आठवीचा वर्ग सुरू करण्यात आला आहे. मात्र, आता त्यासाठी विद्यार्थी संख्या कमी आहे. त्यामुळे शाळेतून सातवीचे विद्यार्थी बाहेर न जाताच आपल्याच शाळेत असावेत, यासाठी शिक्षकांची तसेच मुख्याध्यापकांची धडपड सुरू आहे. त्यामुळे पालकांना अथवा विद्यार्थ्यांना अशा प्रकारच्या धमक्या देऊन अथवा त्यांना बळजबरीने आपल्या मुलांना याच शाळेत ठेवावे यासाठी बळजबरी केली जात आहे. या शाळेत आठवीचे वर्ग नसल्याने आम्ही दुसऱ्या शाळेत शिवानीचा प्रवेश घेतला होता. मात्र, त्यासाठी सायकल परत मागणे चुकीचे आहे. ही सायकल शिक्षण मंडळाने दिलेली नाही. आम्ही शाळेकडे तक्रार केल्यानंतर अखेर शाळा दाखला देण्यास तयार झाली असून, हा प्रकार गैरसमजातून झाल्याचे सांगण्यात आले. मात्र, ही बाब कोणाशीही घडू नये.- संतोष देवदास (शिवानीचे पालक)