शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

यंदाचा पावसाळाही करू या ट्रेंडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:09 IST

रेनकोट म्हटले की फक्त पावसापासून संरक्षण असा समज गेल्या काही दिवसांपासून बदलायला लागला आहे. आजची तरुणाई यातही नावीन्यता शोधून ...

रेनकोट म्हटले की फक्त पावसापासून संरक्षण असा समज गेल्या काही दिवसांपासून बदलायला लागला आहे. आजची तरुणाई यातही नावीन्यता शोधून सर्वांपेक्षा आपण कसे वेगळे आहोत, आपली आवडीनिवडीची छाप पाडण्याचा प्रयत्न करताना दिसते. फॅशन जगतात प्रत्येक ऋतूनुसार दर वेळेला कपड्यांमध्ये नवे ट्रेंड पाहायला मिळतात. हे नवे ट्रेंड आता रेनकोटमध्येही पाहायला मिळत आहेत. सिंथेटिक कापड, पारदर्शक कापड या सोबतच नवे डिझाईन, पॅटर्नला रेनकोट खरेदी करताना आजची तरुणाई महत्त्व देताना दिसत आहे. रेनकोटविक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनीही हा बदल ओळखला असून त्यानुसार नव्या पद्धतीचे रेनकोट उपलब्ध असल्याचे आपल्याला दिसतील. वयानुसार विविध पद्धतीचे रेनकोट बाजारात उपलब्ध आहेत. ज्येष्ठांकडून पारंपरिक प्लॅस्टिक तसेच सिंथेटिक मटेरिअलचे शर्ट आणि पॅन्ट किंवा पोंचू या पद्धतीच्या रेनकोटला पसंती दिल्या जात आहे. तर मध्यमवयीन नागरिकांकडूनही याच पद्धतीच्या रेनकोटला पसंती दिल्या जात असल्याचे बाजारातील चित्र आहे. मात्र, कॉलेजमध्ये जाणारे तरुण, तरुणी आणि लहान मुलांमध्ये रेनकोट खरेदी करतानाही आजच्या फॅशनच्या नव्या बदलांचा विचार केला जात आहे. पूर्वी पाश्चात्य देशांमध्ये हे बदल पाहायला मिळत होते. आता ग्लोबलायझेशनमुळे विविध देशांच्या फॅशनपद्धती माहीत झाल्यामुळे त्याच पद्धतीची मागणी आजचे तरुण करताना दिसत आहेत.

रेनकोटमध्ये डोक झाकणारे हूड हे अॅडजेस्टेबल असते. साधारणत: त्रिकोणी आणि गोलाकार असे हूड असणारे रेनकोट बाजारात असतात. नव्या फॅशन ट्रेंडनुसार मुख्य रेनकोटपासून वेगळे होणारे हूड असलेल्या रेनकोटला बाजारात मागणी आहे. पावसात घालायला आणि काढायला सोपे असलेले बटन असलेले शर्टसारख्या रेनकोटला मुलांची पसंती आहे. हे रेनकोट खरेदी करताना रंग, कापडाचा दर्जाला महत्त्व दिले जाते. यासोबतच लांब असलेले पोंचू प्रकारातील रेनकोटला मुले आणि मुली तसेच महिला प्राधान्य देत आहे. पोंचू लांब असल्याने दुचाकी चालवताना गैरसोय होत नाही. महिलांकडून पारदर्शक पोंचू घेण्याला प्राधान्य दिले जाते. पोंचू वजनाने हलके असते. यातून मुलींना विविध रंगाचे, डिझाइन उपलब्ध असल्याने त्यांना रेनकोट घालून शो ऑफ करता येत असल्याने मुली या प्रकारच्या रेनकोटला प्राधान्य देत आहेत. मुलांकडून जॅकेट पद्धतीच्या तसेच दोन्ही बाजूने वापरता येईल अशा रेनकोटला प्राधान्य दिले जात आहे. दुचाकी चालवताना आपण आकर्षक दिसावे यासाठी जॅकेट, हूड आणि स्टायलिश रेनकोटची मागणी तरुण करत आहेत. ही मागणी करताना विशेष रंगाचा आणि डिझाइनचा विचार प्राधान्याने होत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मोबाईल, वॉलेट, तसेच इतर यांत्रिक वस्तूंचे संरक्षण करण्यासाठी विशेष पद्धतीचे खिचे असलेल्या रेनकोटलाही मागणी आहे. रेनकोट घेताना पाठीवरच्या बॅगेचेही पाण्यापासून संरक्षण होईल या दृष्टीने बॅगकव्हरची मागणीही केली जाते.

रेनकोट हा केवळ पावसापासून बचाव करण्यापुरता राहिला नसून त्यातून शरीरयष्टी कशी आकर्षक दिसेल याचाही विचार आजची तरुणाई करत आहे. यामुळे विरील रेनकोटमधील नव्या ट्रेंडचा विचार करून त्या पद्धतीचे रेनकोट खरेदी करून यंदाचा पावसाळा या माध्यमातून ट्रेंडी केला जात आहे.

-निनाद देशमुख