शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

भीमा खोऱ्यातील पंचवीसपैकी १५ धरणात २० टक्क्यांपेक्षा कमी पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 12:45 IST

दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील भीमा व कृष्णा खो-यातील बहुतांश धरणातील पाणीसाठा तळाला गेला आहे.

ठळक मुद्देभीमा खोरे : सात धरणात शून्य टक्के पाणीसाठी

पुणे: भीमा खो-यातील पंचवीसपैकी १५ धरणांमध्ये २० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा असून सात धरणात शून्य टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. धरणांनी तळ गाठल्याने शेतीसाठी नाही तर पिण्यासाठीही पाणी मिळणे अवघड झाले आहे. त्यातच मान्सूनचे आगमन लांबल्यामुळे दुष्काळाची तिव्रता अधिक जाणवू लागली आहे. मात्र, पुणे शहर व परिसराला पाणी पुरवठा करणा-या वरसगाव, पानशेत आणि खडकवासला धरणात ३.५५ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.दुष्काळी परिस्थितीमुळे राज्यातील भीमा व कृष्णा खो-यातील बहुतांश धरणातील पाणीसाठा तळाला गेला आहे. त्यात पुणे जिल्हा व परिसरातील काही भागाला पाणी पुरवठा करणा-या भीमा खो-यातील २५ पैकी वडीवळे, आंद्रा आणि खडकवासला धरणात ३५ ते ४० टक्के पाणीसाठा आहे. तर पिंपळगाव जोगे, वडज, डिंभे, घोड, टेमघर,नाझरे धरणात शून्य टक्के पाणीसाठा असून उजणी धरणातील मृतसाठाही वापरला जात आहे. त्यामुळे उजणीत उणे ५४.३४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. भीमा खो-यातील २५ पैकी माणिकडोह, येडगाव, विसापूर, कळमोडी, चासकमान,भामा आसखेड,पवना,कासारसाई, मुळशी, वरसगाव, पानशेत, गुंजवणी, निरा देवधर, भाटघर, वीर धरणात २० टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा शिल्लक आहे.त्यातील काही धरणांमध्ये 5 ते 10 टक्क्यांपेक्षाही कमी पाणीसाठा आहे.उन्हाचा तडाखा वाढत असल्याने बाष्पिभवनामुळे पाणीसाठ्यात घट होत आहे.पाऊस लांबल्यास नागरिकांच्या पिण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे.त्यामुळे उपलब्ध पाणीसाठ्याचा नियोजनपूर्वक वापर करणे गरजेचे आहे,असे जलसंपदा विभागातील अधिका-यांकडून सांगितले जात आहे.-------------------------------------

खडकवासला धरणा प्रकल्पात 3.55 टीएमसी पाणी पुणे शहर व परिसराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला धरण प्रकल्पांतर्गत येणा-या टेमघर धरणात दुरूस्तीच्या कारणामुळे शून्य टक्के पाणीसाठा आहे.त्यामुळे सध्या वरसगाव,पानशेत आणि खडकवासला धरणातील पाणीसाठ्यावरच अवलंबून रहावे लागत आहे.खडकवासला धरण प्रकल्पात सध्या केवळ 3.55 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.येत्या जुलै महिन्यापर्यंत पुरेल एवढे पाणी धरणात उपलब्ध असल्याने पुणे शहर व परिसरातील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही,असे जलसंपदा विभागाकडून सांगितले जात आहे.

 

भीमा खो-यातील धरणांची पाणीसाठ्याची टक्केवारी     धरण                     टक्केवारी    पिंपळगाव जोगे       ०.००  माणिकडोह             १.०६येडगाव                  ५.७६  वडज                    ०.०० डिंभे                      ०.००   घोड                        ०.००   विसापूर                 ३.२४कळमोडी                  १८.०९  चासकमान               ३.७० भामा आसखेड        ८.८७   पवना                      १९.८० कासारसाई               १०.०२मुळशी                    ६.६५टेमघर                     ०.००  वरसगाव                ८.०८ पानशेत                   १६.०४गुंजवणी                १०.५३ निरा देवधर              १.७९  भाटघर                 ५.५५ वीर                          ३.६७नाझरे                    ०.०० उजनी                     (उणे)-५५.३४-------वडीवळे              ३५.११  आंद्रा                  ४०.८५खडकवासला       ४१.०१  ---------------------------

टॅग्स :PuneपुणेDamधरणdroughtदुष्काळWaterपाणीFarmerशेतकरी