शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
2
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
3
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
4
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
5
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
6
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
7
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
8
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
9
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
10
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
11
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
12
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
13
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
14
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
15
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
16
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
17
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
18
नागरिकत्व नियमांमध्ये मोठे बदल! अल्पवयीन मुलांसाठी पासपोर्टचे नियम अधिक कडक, OCI नोंदणी ऑनलाइन
19
'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...
20
मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स रॅकेटवर मोठी कारवाई, ३४९ किलो हाय-ग्रेड कोकेन पकडले, किंमत हजारो कोटींमध्ये 
Daily Top 2Weekly Top 5

विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद

By admin | Updated: May 25, 2015 23:07 IST

आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील झापवस्ती येथे सोमवारी पहाटे अंदाजे पाच वाजता शिकारीचा पाठलाग करताना अडीच वर्षांचा बिबट्या विहिरीत पडला.

अवसरी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील झापवस्ती येथे सोमवारी पहाटे अंदाजे पाच वाजता शिकारीचा पाठलाग करताना अडीच वर्षांचा बिबट्या विहिरीत पडला. मात्र, आठ तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला जिवंत बाहेर काढण्यात आले. बिबट्या निवारा केंद्र माणिकडोहच्या डॉक्टरांच्या पथकाने बिबट्याला पडकले, त्याला पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होेती.येथील शेतकरी बबन जाधव व सुभाष जाधव यांच्या शेतालगत एक विहीर आहे. बबन जाधव हे विहिरीतील पाणी किती आले, वीज आली का? हे पाहण्यासाठी विहिरीजवळ गेले असता, त्यांना विहिरीतून ओरडण्याचा आवाज आला. त्यांनी विहिरीत डोकावून पाहिले असता, त्यांना विहिरीत बिबट्या दिसला. बबन जाधव यांनी आपल्या भावाला विहिरीत बिबट्या असल्याचे सांगितले. त्यानंतर सुभाष जाधव यांनी लगेचच गावचे सरपंच विठ्ठल टिंगरे यांना विहिरीत बिबट्या पडल्याचे कळविले. त्यानंतर सरपंच विठ्ठल टिंगरे यांनी शिरूर वनविभागाला कळविले. त्यानंतर बिबट्या निवारा केंद्र व डॉ. अतुल देशमुख, महेंद्र ढोबे, डॉ. गोरक्ष सोनवणे यांच्या टिमने सकाळी ८ वाजता विहिरीमध्ये प्रथम लोखंडी कॉट टाकली व विहिरीच्या कडेने काटेरी झुडुप टाकले. मात्र, प्रयत्न करूनही बिबट्या कॉटवर येईना, त्यानंतर दुपारी साडेबारा वाजता जेसीबीच्या साहाय्याने वन विभागाने पिंजरा विहिरीत सोडला. पहिल्या वेळेला बिबट्या पिंजऱ्यात येण्यास अपयश आले. त्यानंतर पुन्हा विहिरीत पिंजरा सोडला. मात्र अथक प्रयत्नांनंतर बिबट्या पिंजऱ्यात गेला आणि वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व डॉक्टरांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.बिबट्या पकडण्यासाठी वनपरिक्षेत्र अधिकारी डी. जी. फाफाळे, डी. बी. सपकाळ, डी. वाय. मुरके, डॉ. अतुल देशमुख, डॉ. गोरक्ष सोनवणे, महेंद्र ढोमे व सरपंच विठ्ठल टिंगरे व ग्रामस्थ, सागर हिंगे, कैलास जाधव यांचे सहकार्य लाभले.बिबट्याला जिवंत पकडण्यात वनविभागाला यश आल्याने ग्रामस्थांनी वनविभागाचे त्यांच्या डॉक्टरांचे अभिनंदन केले.आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात उसाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात वाढल्याने बिबटे व अन्य वनप्राणी यांचा वावर वाढला आहे. मात्र, तालुक्यातील उसाचे क्षेत्र तुटून गेल्याने बिबट्यांना लपण्यासाठी जागा नसल्याने बिबटे खाद्य शोधण्यासाठी मानव वस्तीकडे वळू लागले आहेत. त्यामुळेच बिबट्यांचा वावर वाढल्याने तालुक्यात भीतीचे वातावरण आहे.४बिबट्या निवारा केंद्र माणिक डोह या ठिकाणात यापूर्वी २९बिबटे ठेवण्यात आले आहे. त्यात अजून बिबट्या वाढल्याने आता या निवारा केंद्रात ३० बिबटे झाल्याची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.