शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
4
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
5
विदर्भकराचा इम्पॅक्ट! PBKS ला शह देण्यासाठी RR नं खेळलेली 'ती' चाल ठरली मॅचचा टर्निंग पॉइंट
6
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
7
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
8
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
9
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
10
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
11
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
12
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
13
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
14
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
15
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
16
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
17
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
18
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
19
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
20
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
Daily Top 2Weekly Top 5

जाधववाडीत विहिरीत पडलेला बिबट्या जेरबंद

By admin | Updated: June 28, 2015 00:28 IST

जाधववाडी (ता. जुन्नर) येथील लोखंडेवस्तीच्या शिवारात आज पहाटेच्या सुमारास भक्ष्याच्या शोधार्थ विहिरीत पडलेल्या बिबट्याला ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत काही तासांतच जीवदान दिले.

राजुरी : जाधववाडी (ता. जुन्नर) येथील लोखंडेवस्तीच्या शिवारात आज पहाटेच्या सुमारास भक्ष्याच्या शोधार्थ विहिरीत पडलेल्या बिबट्याला ग्रामस्थांनी सतर्कता दाखवत काही तासांतच जीवदान दिले.दरम्यान, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने पिंजरा विहिरीत सोडून या बिबट्याला जेरबंद केले. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, बोरी परिसरातील जाधववाडीतील लोखंडे वस्तीतील दत्तात्रय सुखदेव घोलप यांच्या उसाच्या शेतातील विहिरीत आज पहाटेच्या सुमारास भक्ष्याच्या शोधात असताना बिबट्या पडला. सकाळीच त्यांचा पुतण्या अवधुत बाळशीराम घोलप यांनी या विहिरीत डरकाळीचा आवाज ऐकला. घोलप कुटुंबीय विहिरीपाशी गेले असता, त्यांना बिबट्या पडल्याचे दिसले.बिबट्या आपला जीव वाचवण्यासाठी कासावीस झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी भ्रमणध्वनीवरून ग्रामस्थांना बोलावून तातडीने एक मोठी दोरी खाली सोडली. तोच कासावीस झालेल्या बिबट्याने त्या दोरीचा आधार घेतला बुडता बुडता बिबट्याचे प्राण वाचले व नंतर चौपाळा विहिरीत सोडला. बिबट्याला या चौपाळ्याचा जीव वाचवण्यासाठी भक्कम आधार मिळाला.वनविभागाला याबाबत ग्रामस्थांनी सकाळीच माहिती दिली. आळे वनविभाग अधिकारी व कर्मचारी तसेच एसओएसचे कर्मचारी सकाळच्या सुमारास पिंजऱ्यासह घटनास्थळी दाखल झाले. ग्रामस्थांच्या सहकार्याने त्यांनी पिंजरा विहिरीत सोडला. अवघ्या काही मिनिटातच बिबट्या या पिंजऱ्यात जेरबंद झाला. या बिबट्याला जुन्नरजवळील माणिकडोह बिबट्या निवारण केंद्रात नेऊन सोडले.