शिरूर- भीमाशंकर महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 13:31 IST2021-01-28T13:19:56+5:302021-01-28T13:31:04+5:30

अज्ञात वाहनाने ३ महिन्याच्या बछड्याला धडक दिल्याने डोक्याला जबर मार लागुन बछडा जागीच ठार झाला.

Leopard baby died in vehicle accident on Shirur-Bhimashankar highway | शिरूर- भीमाशंकर महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू 

शिरूर- भीमाशंकर महामार्गावर वाहनाच्या धडकेत बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू 

राजगुरुनगर: खेड तालुक्यातील पश्चिम भागातील तनपुरे वस्ती (ता. खेड ) येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत तीन महिन्याचा मादी जातीचा बछडा ठार झाल्याची घटना घडली आहे.

शिरूर -भिमाशंकर या राज्य महामार्गावर बुरसे वाडीलगत तनपुरे वस्ती येथे अज्ञात वाहनाने ३ महिन्याच्या बछड्याला धडक दिल्याने डोक्याला जबर मार लागुन बछडा जागीच ठार झाला. हि घटना आज (दि २८ ) सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली. ही घटना वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना कळतात घटनास्थळी धाव घेतली. हा मादी जातीचा बछडा आहे. त्यांचे वजन  ६ किलो आहे. घटनास्थळी वन परिक्षेत्र अधिकारी योगेश महाजन, वनपाल प्रदीप कासारे, एन .डी  विधाटे, आर एस, गोकुळे, एस.आर.राठोड ,सीमा सपकाळ यांनी भेट दिली. तसेच खरपुडी (ता खेड ) येथे रोपवाटिकामध्ये मृत बछड्याचे अग्नी दहन करण्यात आले. डोंगरदऱ्यातून पाणी पिण्यासाठी हा बछडा चासकमान धरण परिक्षेत्रात येत असताना रस्ता ओलांडताना अपघात झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

Web Title: Leopard baby died in vehicle accident on Shirur-Bhimashankar highway