शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

Leopard Attack : भय इथले संपत नाही..! २७ दिवसांत चौथा बिबट वनविभागाच्या ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 18:29 IST

पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद करण्यात ओतूर वनविभागाला यश आले, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी कांबळे यांनी दिली.

ओतूर : जुन्नर तालुक्यातील कोपरे गाव परिसरात मागील काही दिवसांपासून बिबट्याच्या वावरामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ग्रामस्थांच्या सततच्या मागणीनुसार कोपरे गावठाण हद्दीत वनविभागाच्या वतीने पिंजरा लावण्यात आला होता. अखेर बुधवार दि. २१ जानेवारी रोजी रात्री सुमारे १० वाजण्याच्या सुमारास या पिंजऱ्यात बिबट्या जेरबंद करण्यात ओतूर वनविभागाला यश आले, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांनी दिली.

बिबट्या पिंजऱ्यात अडकल्याची माहिती मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी चैतन्य कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सचिन मोढवे, वनरक्षक कोमल डाखोरे तसेच वनमजूर सुभाष डामसे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीची पाहणी करून आवश्यक खबरदारी घेत बिबट्याला सुरक्षितरीत्या ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर या बिबट्याला पुढील उपचार व निरीक्षणासाठी माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रात हलविण्यात आले.

वनविभागाच्या प्राथमिक तपासणीनुसार हा बिबट मादी असून, तिचे वय अंदाजे चार वर्षे असल्याचे सांगण्यात आले आहे. सध्या ती पूर्णपणे सुरक्षित असून, तिच्या प्रकृतीवर वनतज्ज्ञांचे बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. विशेष म्हणजे मागील २७ दिवसांच्या कालावधीत याच परिसरात वनविभागाने तब्बल चार बिबट्यांना जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. त्यामुळे वनविभागाच्या सतर्कतेमुळे व त्वरित कारवाईमुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असून, ग्रामस्थांनी वनविभागाच्या कार्याचे कौतुक केले आहे. भविष्यातही मानवी वस्ती आणि वन्यजीव यांच्यातील संघर्ष टाळण्यासाठी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जाईल, असे आश्वासन वनविभागाच्या वतीने देण्यात आले आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Fourth Leopard Captured in 27 Days by Forest Department

Web Summary : In Junnar, a fourth leopard was captured in 27 days near Kopre village. The forest department successfully trapped the female leopard, estimated to be four years old, after villagers reported concerns. The leopard is under observation at Manikdoh Rescue Center. Villagers praise the forest department's swift action.
टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडLeopard Attackबिबट्याचा हल्लाPuneपुणेMaharashtraमहाराष्ट्र