शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

माळीण पुनर्वसन अंतिम टप्प्यात

By admin | Updated: January 26, 2017 00:09 IST

माळीण पुनर्वसनाचे काम ९० टक्के पुर्ण झाले असून फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीत ग्रामस्थांना आपले हक्काचे घर ताब्यात देणार असल्याचे

घोडेगाव : माळीण पुनर्वसनाचे काम ९० टक्के पुर्ण झाले असून फेब्रुवारी महिन्याच्या अखेरीत ग्रामस्थांना आपले हक्काचे घर ताब्यात देणार असल्याचे जिल्हाधिकारी सौरभ राव यांनी सांगितले. माळीण पुनर्वसनाच्या सुरू असलेल्या कामाचा आढावा व पहाणी करण्यासाठी जिल्हाधिकारी माळीणमध्ये आले होते. यावेळी उपवनसंरक्षक अर्जुन म्हसे पाटिल, प्रांत अधिकारी कल्याण पांढरे, कार्यकारी अभियंता प्रशांत पाटिल, सिटी कॉर्पोरेशन अनिरूध्द देशपांडे, विवेक कुलकर्णी, तहसिलदार रविंद्र सबनिस, वनक्षेत्रपाल योगेश महाजन, नायब तहसिलदार विजय केंगले, शुभम डेव्हलपर्सचे विनय बडेरा इत्यादी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जगन्नाथ अंकुश, सावळेराम लेंभे, कमाजी पोटे, गणेश पोटे इत्यादी ग्रामस्थ व महिला उपस्थित होत्या. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, एकुण ६८ घरे बांधली जाणार असून सध्या ४४ घरांची कामे पुर्ण झाली आहेत व उर्वरीत कामे १० फेब्रुवारी पर्यंत पुर्ण होतील तसेच पायाभुत सोईसुविधांची कामे ८० टक्के पुर्ण झाली असून सर्व ठेकेदारांना १५ फेब्रुवारी पर्यंतची अंतिम मुदत दिली आहे. कामांचा आढावा घेण्यासाठी दि.१० रोजी परत येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच आत्ता पर्यंत झालेली सर्व कामे उत्तम दर्जाची झालेली असून हि कामे त्रयस्त यंत्रणे कडूनही तपासण्यात आली आहेत. यामध्ये कॉलेज आॅफ इंजिनीअरींग पुणे, इंपथी फौंडेशन यांनी कामे तपासून तसे प्रमाणपत्रही दिले आहे. घरांच्या रंगकामात व भिंती, समाजमंदिर, ग्रामपंचायत, शाळा, गोठा यांच्या भिंतीवर पर्यावरण पुरक कल्पनेवर चित्र काढली जाणार आहेत. या भिंतींवर माळीणचा इतिहास, घटने बद्दल माहिती, आदिवासी कला व संस्कृती दाखविणारी चित्र असतील.