'लाडक्या भावाला अखेरचा निरोप', रक्षाबंधनाच्या दिवशी चाकणकर यांच्यावर दुःखाचा डोंगर, मावसभावाचे निधन
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2025 14:00 IST2025-08-10T13:59:28+5:302025-08-10T14:00:58+5:30
रक्षा बंधनासारख्या नात्यांच्या आणि स्नेहबंधांच्या सणाच्या दिवशीच ही दुःखद घटना घडल्याने चाकणकर यांच्यासह संपूर्ण कुटुंबाला हा मोठा धक्का बसला

'लाडक्या भावाला अखेरचा निरोप', रक्षाबंधनाच्या दिवशी चाकणकर यांच्यावर दुःखाचा डोंगर, मावसभावाचे निधन
पुणे : महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्यावर रक्षा बंधनाच्या दिवशी दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मावस भावाचा, बाळराजे माळी यांचा, काल रात्री दुःखद निधन झाला. या घटनेमुळे चाकणकर कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. बाळराजे माळी हे चाकणकर यांचे लाडके मावस भाऊ होते. त्यांचे व्यक्तिमत्त्व मनमिळाऊ आणि प्रेमळ असल्यामुळे कुटुंबीय व मित्रपरिवारात त्यांना विशेष मान होता. त्यांच्या अचानक निधनाची बातमी समजताच परिसरात हळहळ व्यक्त करण्यात आली आहे.
रूपाली चाकणकर यांनी आपल्या मावस भावाच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे – "माझ्या लाडक्या भावाला अखेरचा निरोप…" या भावनिक शब्दांत त्यांनी आपल्या दुःखाला शब्द दिले. रक्षा बंधनासारख्या नात्यांच्या आणि स्नेहबंधांच्या सणाच्या दिवशीच ही दुःखद घटना घडल्याने चाकणकर यांच्यासह संपूर्ण कुटुंबाला हा मोठा धक्का बसला आहे. विविध राजकीय, सामाजिक आणि महिला संघटनांकडून बाळराजे माळी यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात येत आहे"