शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यातील महादेववाडी-उंड्री परिसरात पिण्याच्या पाण्यात अळ्या; नागरिकांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2026 13:04 IST

पुढील दोन दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास पुणे महापालिका आयुक्तांच्या दालनात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा नागरिकांचा इशारा

हडपसर : पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ४१ अंतर्गत येणाऱ्या महादेववाडी-उंड्री परिसरातील घुलेनगरमध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर अळ्या आढळून आल्याचे समोर आले. पिण्याच्या पाण्यासारख्या अत्यावश्यक सेवेत झालेल्या या गंभीर त्रुटीमुळे आरोग्यावर थेट परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिसरात तीव्र चिंता व संतापाचे वातावरण आहे.

तसेच सर्व्हे क्रमांक १२ परिसरात मलनिस्सारण वाहिनीमधील सांडपाणी काही घरांमध्ये शिरत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या परिस्थितीमुळे लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व महिला यांच्या आरोग्यास संसर्गजन्य आजारांचा धोका संभवत आहे. संबंधित विभागाकडून वेळेवर देखभाल व दुरुस्ती न झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे. या संदर्भात शिंदेसेनेचे शहर प्रमुख प्रमोद भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांना निवेदन देण्यात आले. त्यामध्ये महादेववाडी परिसरात तातडीने स्वच्छ व निर्जंतुक पिण्याच्या पाण्याचा पर्यायी पुरवठा सुरू करणे, विद्यमान पाणीपुरवठा वाहिन्यांची तांत्रिक तपासणी करून आवश्यक दुरुस्ती करणे तसेच ड्रेनेज व्यवस्थेतील बिघाडावर त्वरित कायमस्वरूपी उपाययोजना करणे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी पुढील दोन दिवसांत ठोस कार्यवाही न झाल्यास पुणे महापालिका आयुक्तांच्या दालनात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पाणी गढूळ येत असल्याची तक्रार आम्ही करत होतो. प्रत्यक्ष पाण्यात अळ्या दिसल्यावर धक्का बसला. हेच पाणी पिण्यासाठी, स्वयंपाकासाठी वापरले जाते. लहान मुलांचे आणि ज्येष्ठांचे आरोग्य धोक्यात आले आहे. महापालिकेने तातडीने स्वच्छ पाण्याची व्यवस्था करावी. - संगीता नलावडे, स्थानिक रहिवासी

वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून दखल घेतली जात नाही. आजारी पडल्यावर जबाबदारी कोण घेणार ? जर लवकर उपाययोजना झाल्या नाही, तर आम्ही देखील आंदोलनात सहभागी होणार आहोत. - आनंद माने, स्थानिक रहिवासी

English
हिंदी सारांश
Web Title : Worms found in Pune's water supply; residents express outrage.

Web Summary : Residents of Pune's Mahadev Wadi-Undri area found worms in drinking water, raising health concerns. Sewage also entered homes. Locals demand immediate clean water supply and drainage repairs. Protest threatened if action isn't taken promptly.
टॅग्स :Pune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाHealthआरोग्यHadapsarहडपसरSocialसामाजिकSenior Citizenज्येष्ठ नागरिकWaterपाणी