शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

भुयारी मार्ग रोगांचे माहेरघर

By admin | Updated: October 17, 2015 01:12 IST

स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना शहरात निर्माण केलेल्या सुविधांचा योग्य उपयोग होत नसेल, तर त्याचा काय उपयोग, असा सवाल नागरिक करत आहेत.

चंदननगर : स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल करत असताना शहरात निर्माण केलेल्या सुविधांचा योग्य उपयोग होत नसेल, तर त्याचा काय उपयोग, असा सवाल नागरिक करत आहेत. यासाठी त्यांच्याकडून नगर रस्त्यावरील दोन भुयारी मार्गाचे उदाहरण दिले जात आहे. त्यात विमाननगर चौक, चंदननगरचा समावेश आहे.विमाननगर चौकातील कोंडी बघता पायी चालणाऱ्या नागरिकांसाठी भुयारी मार्ग तयार करण्यात आला; पण नागरिक याचा वापर करताना दिसत नाहीत. कारण, येथे विविध प्रकारच्या समस्या दिसून येतात. या मार्गावरील पायऱ्या व मार्गातील परिसरातील टवाळखोर उपद्रव करत बसतात; तसेच भुयारी मार्ग मद्यपींसाठी बारच बनला आहे. रात्रीच्या वेळी सर्रास पार्ट्या होत असल्याचे मार्गातील कचरा व मद्याच्या बाटल्यांवरून समजते. दरम्यान, या मार्गावरून येणाऱ्या महिला-तरुणींची छेडछाड करत असल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून येत आहेत; तसेच भुयारी मार्गात ठिकठिकाणी चेंबर्स ठेवण्यात आल्याने ते चेंबर सांडपाण्याने तुडुंब भरून त्यातील दुर्गंधीयुक्त पाणी व पावसाचे पाणी हे याच ठिकाणी साचून दुर्गंधी निर्माण होत आहे. येथून मार्गक्रमण करणाऱ्या नागरिकांना या घाण पाण्यातून मार्ग काढावा लागत असल्याने नागरिक या मार्गाचा वापर टाळत नेहमीच्या मार्गाचा वापर करत असल्याचे दिसून येत आहे.नगर रस्त्यावरील दुसरा भुयारी मार्ग चंदननगर येथे उभारण्यात आला आहे. या ठिकाणी चंदननगर मुख्य बाजारपेठ व एअरफोर्स शाळा असल्या कारणाने हा मार्ग उभारण्यात आला. या मार्गाचा वापर मुख्यत: शाळकरी विद्यार्थी, महिला व ज्येष्ठ नागरिक करतात; मात्र मार्गात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पालिका प्रशासनाने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेले भुयारी मार्ग सुस्थितीत आणून नागरिकांची गैरसोय दूर करणे गरजेचे आहे. पालिकेने याकडे लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. (वार्ताहर)