शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षाचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
2
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
3
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
4
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
5
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
6
मित्रपक्षांमुळे भाजपला ‘४०० पार’ची चिंता; सर्वाधिक काळजी महाराष्ट्रात
7
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
8
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
9
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
10
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
11
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज
12
चला... सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी; गाड्या फुल्ल : मतदानासाठी चाकरमानी निघाले गावाकडे 
13
ठाण्यावर मालकी हक्क सांगणाऱ्यांची मस्ती उतरवणार; सीमेवरील जवानही असुरक्षित - उद्धव ठाकरे
14
सरशी कोणाची? शिंदेगटाची की उद्धवसेनेची?
15
नसीम खान यांची नाराजी काँग्रेसने कशी दूर केली?
16
राजकीय पक्षांना देणगी देणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगच्या उपकंपनीसाठी नागपूर महानगरपालिका मेहेरबान
17
नोकऱ्या देणाऱ्यांना मदत करणाऱ्यांचे हात आखडते; २०२३ मध्ये केवळ एका स्टार्टअपला युनिकॉर्नचा दर्जा
18
२ वर्षांपूर्वी मिळाला पद्मश्री, आता करावी लागतेय मजुरी
19
वाळू माफियांनी एएसआयला चिरडले; अंगावर टॅक्टर घातल्याने झाला मृत्यू 
20
सरन्यायाधीशांना झाली होती शिक्षा; स्वत: सांगितला किस्सा

...म्हणून कचराडेपोमध्ये केले हळदी कुंकू 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 3:28 PM

स्वछतेच्या मानांकनात मागील वर्षी लोणावळा शहराचा देशात सातवा क्रमांक आहे. सध्या लोणावळा शहर शंभर टक्के कचराकुंडी मुक्त असून घरोघरचा कचरा  घंटागाडीत ओला व सुका असे वर्गीकरण करुन गोळा केला जातो.

पुणे :  लोणावळा शहर व परिसरातील ग्रामीण भागात राहणार्‍या महिलांना स्वच्छतेचे आणि कचरा वर्गीकरणाचे महत्व पटावे म्हणून लोणावळ्यात चक्क महिलांनी कचराडेपोमध्ये हळदी कुंकू समारंभ साजरा केला. लोणावळा नगरपरिषद महिला व बालकल्याण समिती तसेच प्रगती महिला नागरी सह पतसंस्था यांच्यावतीने रथसप्तमी निमित्त वरसोली येथील कचरा डेपोवर हळदी कुंकू समारंभ पार पडला.

              सुमारे पाच ते सहा हजार महिलांनी हळदी कुंकू समारंभा व्यतिरिक्त प्रत्यक्षात कचराडेपोवरील कामकाजाची माहिती घेतली. स्वछतेच्या मानांकनात मागील वर्षी लोणावळा शहराचा देशात सातवा क्रमांक आहे. सध्या लोणावळा शहर शंभर टक्के कचराकुंडी मुक्त असून घरोघरचा कचरा  घंटागाडीत ओला व सुका असे वर्गीकरण करुन गोळा केला जातो. मात्र हा कचरा वर्गीकरण करुन का द्यावा, कचर्‍याचे पुढे काय होते याबाबत महिलांच्या मनात अनेक प्रश्न होते. या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी थेट कचरा डेपोमध्येच हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आला.            याबाबत नगराध्यक्षा सुरेखा जाधव म्हणाल्या की, 'लोणावळा शहरात मागील दोन वर्षापासून स्वच्छतेचा जागर सुरु आहे. यासाठी ह्या आगळ्या वेगळ्या हळदी कुंकु समारंभाचे आयोजन केले होते. महाराष्ट्रातील हा पहिलाच वेगळा उपक्रम असून याठिकाणी महिलांना ओल्या कचर्‍यापासून बायोगॅस निर्मिती कशी केली जाते तसेच सुक्या कचर्‍यापासून खत कसे बनविले जाते याबाबतची माहिती देण्यात आली.            यावेळी महिला बालकल्याण समितीच्या सभापती सुर्वणा अकोलकर, उपसभापती गौरी मावकर, स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापती संध्या खंडेलवाल, माजी सभापती बिंद्रा गणात्रा, पुजा गायकवाड, काॅग्रेसच्या गटनेत्या आरोही तळेगावकर, मंदा सोनवणे, रचना सिनकर, जयश्री आहेर, प्रगती नागरी पतसंस्थेच्या अध्यक्षा पार्वती रावळ, उप‍ाध्यक्षा रसवंती मानकामे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शैलजा फासे यांनी येणार्‍या महिलांना स्वच्छतेची माहिती देत स्वागत केले.

टॅग्स :lonavalaलोणावळाdumpingकचराSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान