Ladakh should be avoided not as a battlefield, but as a budhhabhumi base: MP Jamayang Tsering Namgyal | लडाख युद्धभूमी म्हणून नव्हे, तर बुद्धभूमी म्हणून नावारूपास यावी : खासदार जाम्यांग त्सेरिंग नामग्याल
लडाख युद्धभूमी म्हणून नव्हे, तर बुद्धभूमी म्हणून नावारूपास यावी : खासदार जाम्यांग त्सेरिंग नामग्याल

ठळक मुद्दे युवक क्रांतिवीर पुरस्काराचे वितरणआम्ही लडाखवासीय भारताचाच भाग भारताचे शेजारील राष्ट्रांबरोबर झालेले प्रत्येक युद्ध लडाखच्या भूमीवरून लढले गेलेसीएए, ३७० मुद्दा कोणताही असो, विद्यार्थी जी टोकाची भूमिका घेतात ते चिंतनीय

पुणे : मुंबई-दिल्लीमध्ये पर्यटनला आले असता आमच्या चेहरापट्टीवरून तुम्ही चिनी, नेपाळी आहात का? असा प्रश्न आमच्याच भारतीय बंधूंकडून विचारला जातो. आम्ही लडाखवासीय भारताचाच भाग असून, आम्ही आमच्या बांधवांच्या परिचयाचे नाहीत, या जाणिवेने मनाला यातना होतात. भारताचे शेजारील राष्ट्रांबरोबर झालेले प्रत्येक युद्धलडाखच्या भूमीवरून लढले गेले. त्यामुळे ‘युद्धभूमी’ अशीदेखील एक ओळख तिला प्राप्त झाली आहे. परंतु लडाखची ओळख युद्धभूमी नव्हे, तर बुद्धभूमी अशी व्हावी, अशी इच्छा लडाखचे खासदार जाम्यांग त्सेरिंग नामग्याल यांनी व्यक्त केली.
श्री पूर्णवाद पॉलिटिकल सायन्स अकॅडमी, पूर्णवाद युवा फोरम आणि जीवन कला मंडळ यांच्या वतीने दिला जाणारा यावर्षीचा ‘युवक क्रांतिवीर’ पुरस्कार लडाखचे खासदार जाम्यांग त्सेरिंग नामग्याल यांना अ‍ॅड. विद्यासागर, डॉ. विष्णू महाराज पारनेरकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला़ त्या वेळी नामग्याल बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उद्योजक नरेंद्र फिरोदिया होते. या वेळी व्यासपीठावर अकॅडमीचे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल संत, सूर्यदत्ता शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रा. डॉ. संजय चोरडिया, एस.एन.बी.पी. शिक्षण संस्था समूहाचे संस्थापक प्रा. डॉ. दशरथ भोसले, डी. वाय. पाटील शैक्षणिक संस्थेचे प्रमुख डॉ. पी. डी. पाटील, पासपोर्ट अधिकारी अनंत ताकवले, अ‍ॅड. गणेश पारनेरकर, लक्ष्मीकांत पारनेरकर आणि सचिन इटकर उपस्थित होते.
या वेळी जीवनकला मंडळातर्फे दर वर्षी दिला जाणारा ‘प्रज्ञावंत पुरस्कार’ प्रा. सुभाषचंद्र प्रतापराव भोसले यांना, तर राजमाता जिजाऊसाहेब भोसले यांच्या जयंतीनिमित्त आणि सती मनकर्णिका माता पारनेरकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त दिला जाणारा मातृधर्म पुरस्कार मंगला चंद्रशेखर इटकर यांना प्रदान करण्यात आला.
.........

गेल्या ७० वर्षांपासून आमचे भारतीय आस्तित्व नव्हते. ३७० कलमाद्वारे मोदीसरकारने घेतलेल्या निर्णयामुळे आम्हाला ओळख मिळाली. ‘काश्मीर ते कन्याकुमारी’ अशी ओळख होण्यापेक्षा ‘लडाख ते कन्याकुमारी’ अशी ओळख झाली पाहिजे. सीएए, ३७० मुद्दा कोणताही असो, विद्यार्थी जी टोकाची भूमिका घेतात ते चिंतनीय आहे. ‘सवाल करो, बवांल मत करो’ या मताचा मी आहे. प्रश्न विचारणे हे जिवंत लोकशाहीचे द्योतक आहे. शिस्त, समाधी आणि ज्ञान या त्रिसूत्रींवरच भारत प्रगती करू शकेल. कोणत्याही विचारधारेची ही त्रिसूत्री हा पाया पाहिजे. कोणत्याही घटनेचे विश्लेषण होऊन सामाजिक माध्यम फॉलो झाले पाहिजे. जाम्यांग त्सेरिंग नामग्याल, खासदार

Web Title: Ladakh should be avoided not as a battlefield, but as a budhhabhumi base: MP Jamayang Tsering Namgyal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.