कृषि संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘कृषक’ उपयुक्त - शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2024 06:05 PM2024-01-17T18:05:33+5:302024-01-17T18:05:44+5:30

शेती फायद्याची होण्यासाठी कृषि संशोधन महत्वाचे असून शेतकऱ्यांना कृषकच्या माध्यमातून उपयुक्त माहिती उपलब्ध होइल

Krishak is useful for bringing agricultural research to farmers Sharad Pawar | कृषि संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘कृषक’ उपयुक्त - शरद पवार

कृषि संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘कृषक’ उपयुक्त - शरद पवार

बारामती : संपुर्ण जगात शेतीक्षेत्रात मोठे बदल होत आहेत. वेगवेगळे आधुनिक संशोधन सुरु आहे. ते संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार असेल तरच हे संशोधन उपयोगी ठरणार आहे. हे संशोधन शेतकऱ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी ‘कृषक’ अत्यंत उपयुक्त आहे, अशा शब्दात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आधुनिक शेतीकडे वळण्याचा संदेश दिला.

बारामती येथील कृषि विकास प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित जागतिक स्तरावरील कृषक या कृषि प्रदर्शनाचे उदघाटन पवार यांच्यासह कर्नाटकचे कृषिमंत्री एन चेलुवरय्या स्वामी यांच्या उपस्थितीत पार पडले. यावेळी पवार पुढे म्हणाले, राजेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली गेल्या काही वर्षांपासून प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येत आहे. यातून शेतकऱ्यांना महत्वाची माहिती मिळते. शेती फायद्याची होण्यासाठी कृषि संशोधन महत्वाचे आहे. शेतकऱ्यांना कृषकच्या माध्यमातून उपयुक्त माहिती उपलब्ध होइल, असे पवार यांनी नमुद केले.

कृषिमंत्री एन चेलुवरय्या स्वामी म्हणाले, ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे देशातील कृषि क्षेत्राच्या विकासासाठी मोठे योगदान आहे. त्यांच्याच प्रयत्नामुळे देशाने कृषि व उद्यानविद्या क्षेत्रात आमुलाग्र बदल झाले.अन्नधान्य आयात करणारा देश अन्यधान्य निर्यात करणारा बनल्याचे कृषिमंत्री स्वामी यांनी नमुद केेले.

खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘अे आय’ तंत्रज्ञानावर आधारीत शेती संशोधन बारामतीत सुरु होत आहे,हे अभिमानास्पद आहे. येत्या वर्षात आपल्या भागात या तंत्राानामुळे क्रांती होइल,असे खासदार सुळे म्हणाल्या. 

ब्राझीलमध्ये १७० ते २०० टन उस उत्पादन

‘अेआय’ तंत्रज्ञान ऊसशेतीसाठी उपयुक्त ठरणार आहे.महाराष्ट्र देशात उसउत्पादनात अग्रेसर आहे.मात्र, ऊसउत्पादनात अनेक अडचणी आहेत. याबाबत बळीराजासमोर अनेक संकटे आहेत.आपल्याकडे ऊस उत्पादन सरासरी ४० ते ५० टन आहे,तर हेच उत्पादन ब्राझीलमध्ये एकरी १७० ते २०० टनावर पोहचले आहे.‘अे आय’तंत्रज्ञानामुळे हे शक्य झाल्याचे कृषि विकास प्रतिष्ठानचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी सांगितले.

Web Title: Krishak is useful for bringing agricultural research to farmers Sharad Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.