उन्हाळी सुट्टीमुळे कोल्हापूर-गोंदिया एकेरी उन्हाळी विशेष जादा गाडया

By अजित घस्ते | Updated: April 21, 2024 18:11 IST2024-04-21T18:08:36+5:302024-04-21T18:11:11+5:30

प्रवाशांची वाढीव गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने अतिरिक्त एकेरी उन्हाळी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे

Kolhapur-Gondia one-way summer special extra trains due to summer vacation | उन्हाळी सुट्टीमुळे कोल्हापूर-गोंदिया एकेरी उन्हाळी विशेष जादा गाडया

उन्हाळी सुट्टीमुळे कोल्हापूर-गोंदिया एकेरी उन्हाळी विशेष जादा गाडया

पुणे: उन्हाळ्यात सुट्टीमुळे कोल्हापूर वरून मराठवाडा, विदर्भ गोदियाकडे जाणा-या प्रवाशांची मोठया प्रमाणात गर्दी वाढत असल्याने प्रवाशांची वाढीव गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने अतिरिक्त एकेरी उन्हाळी विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये ( दि. २२ एप्रिल ) ला गाडी क्रमांक 01489 कोल्हापूर - गोंदिया एकेरी उन्हाळी कोल्हापूरहून 04.00 वाजता सुटेल आणि गोंदियाला दुसऱ्या दिवशी 05.15 वाजता पोहचेल. या कोल्हापूर-गोंदिया एकेरी उन्हाळी विशेष जादा गाडीचा प्रवाशांनी लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. तसेच गाडी क्रमांक 01489 साठी आरक्षण बुकिंग हे सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर खुले आहे. याविशेष गाड्यांच्या थांबण्याच्या वेळेसाठी www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस या ॲप डाउनलोड करावे.

- असे आहेत थांबे

मिरज, सांगली, कराड,सातारा, पुणे, दौंड कॉर्ड लाइन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, वर्धा आणि नागपूर.

- कोट संरचना : 22 आयसीएफ कोचेस यामध्ये 14 स्लीपर, 6 सामान्य द्वितीय श्रेणी, 2 लगेज कम गार्ड ब्रेक व्हॅन .

Web Title: Kolhapur-Gondia one-way summer special extra trains due to summer vacation