शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

जमिनीवर पाडले; तोंडात रुमाल घातला, आजारी ७५ वर्षीय महिलेवर अत्याचार, पुण्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2026 20:44 IST

आरोपीचे वय हे 65 वर्ष असून कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसली तरी त्याने 75 वर्षीय पीडित महिलेबाबत केलेली कृती हा गंभीर गुन्हा आहे

पुणे : आजारी ७५ वर्षीय ज्येष्ठ महिलेला दवाखान्यात नेऊन परत आणताना तोंडात रुमाल घालून बलात्कार करणाऱ्या ५८ वर्षीय व्यक्तीला न्यायालयाने १० वर्षे सक्तमजुरी आणि १२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. विशेष न्यायाधीश एच. के. भालेराव यांनी हा आदेश दिला आहे. दंड न भरल्यास तीन महिने अतिरिक्त कारावास भोगावा लागेल, असे न्यायालयाने आदेशात म्हटले आहे.

ही घटना सप्टेंबर २०१९ मध्ये घडली. याबाबत पीडित ज्येष्ठ महिलेने पौड पोलिसात फिर्याद दिली होती. सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील संजय पवार यांनी ८ साक्षीदार तपासले. त्यांना जिल्हा न्यायालय पैरवी अधिकारी पोलीस निरीक्षक संतोष घोळवे, सत्र न्यायाधीश पैरवी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विद्याधर निचित, हवालदार अल्ताफ इनामदार, अकबर शेख यांनी न्यायालयीन कामकाजासाठी सहकार्य केले.

पीडिता ही आरोपीच्या नात्यातील आहेत. पीडिता आजारी होती. त्यावेळी दवाखान्यात घेऊन गेला. परत येत असताना फिर्यादीच्या मुलाच्या अर्धवट बांधकामावर घेऊन गेला. तेथे फिर्यादीला जमिनीवर पाडून, धमकावून, फिर्यादी ओरडू नये, यासाठी तोंडात रुमाल घालून बलात्कार केला. याबाबत कोणाला सांगू नको, असे म्हणून निघून गेला. फिर्यादी पायी घरी गेली. मुलाला घेऊन जाऊन पौड पोलिसात फिर्याद दिली. या प्रकरणी फिर्यादीच्या अंगावर जखमा झाल्या होत्या. त्यामुळे दाव्यात वैद्यकीय पुरावा महत्त्वाचा ठरला. हा गंभीर गुन्हा आहे. आरोपीला अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी सरकारी वकील संजय पवार यांनी केली. दरम्यान, सद्यस्थिती पाहता सध्याचे आरोपीचे वय हे 65 वर्ष आहे. त्याच्यावर कुटुंबाची जबाबदारी आहे. कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. पण, आरोपीने 75 वर्षीय पीडित महिलेबाबत केलेली कृती हा गंभीर गुन्हा आहे, असे निरीक्षण नोंदवित न्यायालयाने आरोपीला दहा वर्षाची शिक्षा सुनावली.

English
हिंदी सारांश
Web Title : Pune: 75-Year-Old Sexually Assaulted; Man Sentenced to 10 Years

Web Summary : A 58-year-old man in Pune received a 10-year sentence for raping a 75-year-old woman he was escorting home from a hospital. The court also imposed a fine of ₹12,000. The incident occurred in September 2019. The man silenced her by stuffing a cloth in her mouth.
टॅग्स :Pune Crimeपुणे क्राईम बातम्याSenior Citizenज्येष्ठ नागरिकWomenमहिलाCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसCourtन्यायालय