शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
2
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
3
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
4
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
5
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
6
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
7
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
8
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
9
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
10
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
11
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
12
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
13
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
14
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
15
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
16
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
17
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
18
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
19
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
20
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्यांना हातावर सूज येईपर्यंत मारले

By admin | Updated: October 17, 2015 08:35 IST

गृहपाठ केला नाही आणि पुस्तक घरी विसरले यामुळे कोथरूड परिसरातील पी. जोग शाळेतील एका शिक्षकाने सहावीतील १० ते १५ विद्यार्थ्यांना हातावर सूज येईपर्यंत छडीने मारल्याची घटना शुक्रवारी घडली

पुणे: गृहपाठ केला नाही आणि पुस्तक घरी विसरले यामुळे कोथरूड परिसरातील पी. जोग शाळेतील एका शिक्षकाने सहावीतील १० ते १५ विद्यार्थ्यांना हातावर सूज येईपर्यंत छडीने मारल्याची घटना शुक्रवारी घडली. त्यातच पुस्तके घरी विसरलात तर पुन्हा छडीने चोप दिला जाईल, अशी धमकी या शिक्षकाने विद्यार्थ्यांना दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात भीतीचे वातावरण आहे.विद्यार्थ्यांना हसतखेळत शिक्षण द्यावे, विद्यार्थ्यांच्या बालमनावर कोणतीही अपमानास्पद भावना कोरली जाऊ नये याची शिक्षकांनी काळजी घ्यावे, असे शिक्षण विभागातर्फे वारंवार सांगितले जाते. तसेच शासनाने याबाबत कायदेसुद्धा केले आहेत. मात्र, तरीही शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना छडीने शिक्षा दिली जाते. परंतु, केवळ जागरूक पालकांमुळेच अशा प्रकारच्या घटना समोर येतात. स्नेहा जोगळेकर यांची मुले पी. जोग शाळेत शिक्षण घेत आहेत. त्यांच्या सहावीतील मुलीला शिक्षकाने हातावर सूज येईपर्यंत मारले. मुलीच्या हातावर लाल रंगाचे वळ उठले आहेत. त्यामुळे जोगळेकर यांनी शाळा प्रशासनाकडे याबाबत तक्रार केली. शाळा बंद झाल्यानंतर शाळा प्रशासनाकडे याबाबतची तक्रार प्राप्त झाली. त्यामुळे शाळा प्रशासनातर्फे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातील फुटेज पाहून नेमकी घटना काय घडली हे समजून घेतले जाणार आहे, असे शाळा प्रशासनाने सांगितले.संबंधित शिक्षकाला तत्काळ निलंबित केले जाईल. तसेच त्याच्यावर खासगी शाळा सेवाशर्ती कायद्यानुसार शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. त्याच प्रमाणे अशा प्रकारची घटना पुन्हा घडणार नाही याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांना समज देण्यात येईल. - रामचंद्र जाधव, शिक्षण उपसंचालक, पुणे विभागशाळेकडे याबाबत तक्रार आली आहे. विद्यार्थ्यांना मारहाण करू नये, अशा सुचना देण्यात आल्या आहेत. मात्र,वस्तूस्थिती लक्षात घेवून योग्य कारवाई केली जाईल.- विनिता पुरी, मुख्याध्यापक, पी. जोग स्कूलमाझ्या मुलीचा हाताला सुज आली असून त्यावर मलम पट्टी करावी लागली आहे. पुस्तके घरी विसरला किंवा गृहपाठ पूर्ण करून आणला नाही तर पुन्हा छाडीने मारणार असल्याचे शिक्षकाने धमकावले आहे. त्यामुळे मी शाळेकडे याबाबत तक्रार दिली.-स्नेहा जोगळेकर, पालक