शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
2
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
3
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
4
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
5
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
6
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
7
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
8
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
9
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
10
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
11
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
12
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
13
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
14
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
15
Blog: इरफान पठाणला बोलायला काय जातंय! परदेशी खेळाडू नसतील तर IPL मध्ये मजा राहील का?
16
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
17
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
18
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
19
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
20
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट

Pune Crime: अल्पवयीन बहिणींचे अपहरण करून सामूहिक बलात्कार, आरोपीला ९ वर्षांनी बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2024 12:12 PM

याप्रकरणी 2015 साली वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता....

- किरण शिंदे

पुणे : दोन सख्या अल्पवयीन बहिणींचे अपहरण करून त्यांच्यावर सामूहिक बलात्कार करून फरार झालेल्या एका आरोपीला वारजे माळवाडी पोलिसांनी तब्बल ९ वर्षांनी बेडा ठोकल्या. माऊली सखाराम राजिवाडे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी 2015 साली वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, ५ एप्रिल २०१५ रोजी दोन ते तीन जणांनी दोघा अल्पवयीन बहिणींना लग्नाचे आमिष दाखवून पळून गेले होते. त्यांना सोलापूर शहरात घेऊन जाऊन आरोपी धनंजय सखाराम राजीवडे माऊली सखाराम राजीवडे आणि दोन विधीसंघर्षित बालकांनी त्यांच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला होता. वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात कलम ३६३, ३६६, ३७६(अ), ३७७, ३५४(अ), ३२३, ५०४, ५०६(१), ३४ सह बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

या गुन्ह्यातील आरोपी धनंजय सखाराम राजीवडे याला पोलिसांनी तेव्हाच अटक केली होती. त्याचा भाऊ माऊली सखाराम राजीवडे हा २०१५ पासून फरार होता. वारजे माळवाडी पोलीस ठाण्याचे कर्मचारी त्याचा शोध घेत होते. मात्र तो सापडत नव्हता. फरार आरोपीचा कोणताही फोटो पोलिसांकडे नसल्याने त्याचा सुगावा लागत नव्हता. दरम्यान मागील काही दिवसांपासून वारजे माळवाडी ठाण्यातील कर्मचारी या गुन्ह्याचा तपास करत होते. पोलीस शिपाई राहुल हंडाळ आणि पोलीस शिपाई गुजर हे या गुन्ह्याचा तांत्रिक तपास करत असताना आरोपी माऊली हा कोंडवे धावडे येथे राहत असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली होती. त्यानंतर त्यांनी वरिष्ठांना याची माहिती कळवली आणि सापळा रचून आरोपी माऊली राजीवडे याला तब्बल ९ वर्षांनी अटक करण्यात आली. 

ही कारवाई पोलीस उपायुक्त संभाजी कदम, सहाय्यक पोलीस आयुक्त भीमराव टिळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोज शेडगे, पोलीस निरीक्षक निळकंठ जगताप, उपनिरीक्षक रामेश्वर पारवे, पोलीस कर्मचारी सुशांत फरांदे, ज्ञानेश्वर गुजर, रवी गाडे यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी केली.

टॅग्स :PuneपुणेCrime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरण