खेड - कनेरसर रस्त्यावर चारचाकींच्या धडकेत वाहनांचा चक्काचूर; एक जण ठार तर तिघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2021 06:54 PM2021-06-29T18:54:59+5:302021-06-29T18:55:07+5:30

सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली

Khed - Four-wheeler collision on Kanersar road; One was killed and three were seriously injured | खेड - कनेरसर रस्त्यावर चारचाकींच्या धडकेत वाहनांचा चक्काचूर; एक जण ठार तर तिघे गंभीर जखमी

खेड - कनेरसर रस्त्यावर चारचाकींच्या धडकेत वाहनांचा चक्काचूर; एक जण ठार तर तिघे गंभीर जखमी

googlenewsNext
ठळक मुद्देमांडवळा येथे परस्परांविरूद्ध दिशेने येणाऱ्या दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर जबर धडक झाली

राजगुरूनगर: खेड - कनेरसर रस्त्यावर मांडवळा येथे परस्परांविरूद्ध दिशेने येणाऱ्या दोन चारचाकी वाहनांची समोरासमोर जबर धडक झाली. या अपघातात एकजण जागीच ठार झाला असून इतर तीघे गंभीर जखमी झाले आहेत. धंनजय हरिचंद्र गुरव (वय २१ )रा. वाकळवाडी ता खेड असे मुत्यू झालेल्या युवकाचे नांव आहे. ही घटना सोमवारी ( दि २८ ) रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास घडली.

याबाबत खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कार कनेरसर बाजूकडून येत असताना खेड बाजूने येणाऱ्या कारची मांडवळा येथे समोरासमोर भरधाव वेगात जोरदार धडक झाली. या अपघातात मध्ये धंनजय गुरव यांचा जागीच मूत्यू झाला. तर शंकर हनुमंत हराळे ( वय२१ ), शंकर चंद्रकांत कोरडे ( वय १८ ) वाकळवाडी (ता खेड ) व वॅगनर कारचालक शशिकांत तुकाराम बरबटे रा. खरपुडी ( ता खेड ) हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. या अपघातात दोन्ही वाहनाचा चक्काचुर झाला. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक राहुल लाड करत आहे.

Web Title: Khed - Four-wheeler collision on Kanersar road; One was killed and three were seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.