शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

वाघोलीच्या ग्रामसभेत खडाजंगी

By admin | Updated: August 18, 2015 03:53 IST

तंटामुक्ती अध्यक्ष, खाण क्रशर बंद करणे आणि गायरान जमिनीवरील अतिक्रमणांमुळे वाघोलीच्या ग्रामसभेत खडाजंगी झाली. तंटामुक्ती समिती बदलण्याची मागणी

वाघोली : तंटामुक्ती अध्यक्ष, खाण क्रशर बंद करणे आणि गायरान जमिनीवरील अतिक्रमणांमुळे वाघोलीच्या ग्रामसभेत खडाजंगी झाली. तंटामुक्ती समिती बदलण्याची मागणी झाल्यानंतर पुढील ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष व नवीन समितीची स्थापना करण्यात येणार असल्याचे ग्रामपंचायतीच्या वतीने सांगण्यात आले.स्वातंत्र्य दिनानिमित्त घेण्यात आलेली वाघोली ग्रामपंचायतीची ग्रामसभा चांगलीच गाजली. सरपंच संजीवनी वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ग्रामसभेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या गेल्या. तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षांची निवड केली जाणार असल्याने इच्छुक उमेदवारांनी आपापल्या कार्यकर्त्यांसह हजेरी लावल्यामुळे अनेक दिवसांनंतर ग्रामसभेला गर्दी झाली. ग्रामविकास अधिकारी दाते यांनी सुरुवातीला विविध योजनांची माहिती देऊन अपंग लाभार्थ्यांचे वाचन केले. यानंतर तंटामुक्ती समितीबाबत विषय आल्यानंतर तरुणांनी चालू ग्रामसभेतच अध्यक्षांची निवड करण्याची मागणी केली. शासन निर्णयानुसार पुढील ग्रामसभेत अध्यक्ष निवडला जाईल, असे ग्रामपंचातीच्या वतीने सांगण्यात आले. मात्र, वाघोली तंटामुक्ती समितीच्या कार्याबद्दल अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. समितीच्या निवडीवरून सुमारे एक तास ग्रामसभेचे वातावरण संवेदनशील झाले होते.पर्यावरणाला घातक दगडखाणी बंद करण्यात याव्यात आणि याच खाणींना ना हरकत प्रमाणपत्र देण्यात यावे, अशा परस्परविरोधी अर्जांचे वाचन या वेळी करण्यात आले. ग्रामस्थांच्या चर्चेनंतर नवीन खाणींना परवानगी देण्यात येणार नसून, जुन्या खाणींना पुढील १५ आॅगस्टपर्यंतच ना हरकत प्रमाणपत्र देण्याचे ठरविण्यात आले.ग्रामसभेत गायरान जमिनींवरील अतिक्रमणाचा मुद्दादेखील चांगलाच गाजला. केसनंद फाटा येथील अतिक्रमण काढून टाकावे, अशी मागणी प्रामुख्याने होऊ लागली. सन २०००पूर्वीचे अतिक्रमण काढू नये, अशा शासनाच्या सूचना असून इतर अतिक्रमण ग्रामपंचायत काढेल व नवीन अतिक्रमण होणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे माजी उपसरपंच रामदास दाभाडे यांनी सांगितले. (वार्ताहर)