कात्रज दुधाच्या दरात २ रुपयांची वाढ; जाणून घ्या नवे दर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 05:21 PM2023-01-31T17:21:48+5:302023-01-31T17:23:56+5:30

केवळ दूध उत्पादक शेतकऱ्यास मदत करण्याच्या हेतूने ही दरवाढ करण्यात आली

Katraj milk price hiked by Rs 2; Find out the new rates | कात्रज दुधाच्या दरात २ रुपयांची वाढ; जाणून घ्या नवे दर

कात्रज दुधाच्या दरात २ रुपयांची वाढ; जाणून घ्या नवे दर

googlenewsNext

पुणे : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (कात्रज डेअरी) दुधाच्या खरेदी आणि विक्री दरात दोन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. १ फेब्रुवारीपासून गाय दुधाच्या खरेदी दरात प्रति लिटर दोन रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. संघाच्या संचालक मंडळाच्या सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. 

१ फेब्रुवारीपासून गाय दुधाचा ३.५ फॅट व ८.५ एसएनएफसाठी खरेदी दर संस्थांसाठी वरकड खर्चासहित प्रतिलिटर ३७ रुपये ८० पैसे राहील. दूध खरेदी दरात वाढ करण्यात आल्याने दुधाच्या विक्री दरातदेखील वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे आता कात्रज डेअरीच्या दुधाचे दर हे टोण्ड, डबल टोण्ड, प्रमाणित व मलई दुधाच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे.

शेतकऱ्यास मदत करण्याच्या हेतूने ही दरवाढ

इंधनाच्या दरात झालेली दरवाढ, पशुखाद्याचे वाढलेले दर, जनावरांमधील लम्पी आजाराचा त्रास यामुळे दूध उत्पादक शेतकरी अत्यंत अडचणीत आला आहे. या परिस्थितीत केवळ दूध उत्पादक शेतकऱ्यास मदत करण्याच्या हेतूने ही दरवाढ करण्यात आली आहे. - केशरताई पवार, अध्यक्ष, कात्रज डेअरी.

Web Title: Katraj milk price hiked by Rs 2; Find out the new rates

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.