कर्मयोगी कारखाना स्वयंपूर्ण : हर्षवर्धन पाटील  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2017 02:25 AM2017-09-12T02:25:50+5:302017-09-12T02:26:39+5:30

‘‘अथक प्रयत्नांनंतर कर्मयोगी सहकारी साखर कारखाना स्वयंपूर्ण केला आहे. ऊस उत्पादक सभासद शेतकºयांचे सहकार्य मिळाले तर आगामी काळात यशस्वी वाटचालीत कसलीही अडचण येणार नाही,’’ असा विश्वास माजी मंत्री कर्मयोगी सहकारीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी व्यक्त केला.

 Karmayogi factory autocomplete: Harshvardhan Patil | कर्मयोगी कारखाना स्वयंपूर्ण : हर्षवर्धन पाटील  

कर्मयोगी कारखाना स्वयंपूर्ण : हर्षवर्धन पाटील  

Next

इंदापूर : ‘‘अथक प्रयत्नांनंतर कर्मयोगी सहकारी साखर कारखाना स्वयंपूर्ण केला आहे. ऊस उत्पादक सभासद शेतकºयांचे सहकार्य मिळाले तर आगामी काळात यशस्वी वाटचालीत कसलीही अडचण येणार नाही,’’ असा विश्वास माजी मंत्री कर्मयोगी सहकारीचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी रविवारी व्यक्त केला.
कर्मयोगी सहकारी कारखान्याच्या ३२व्या वार्षिक सर्वसाधारणसभा रविवारी पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते. या वेळी उपाध्यक्षा पद्मा भोसले, मयूरसिंह पाटील, कारखान्याचे कार्यकारी संचालक बी. जी. सुतार यांच्यासह सर्व संचालक मंडळ या वेळी उपस्थित होते. म.फुले विद्यालयात खेळीमेळीच्या वातावरणात ही सभा झाली.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की, कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याने कधी कुणाचा रुपयादेखील बुडविला नाही. असंंख्य अडचणींवर मात करत केवळ ऊसउत्पादक सभासद, कारखान्याचे कर्मचाºयांच्या पाठबळावर मार्ग काढत आलो. आजघडीला कारखान्याचे विस्तारीकरण व इतर सर्व अनुषंगिक बाबींची पूतर्ता करण्यात आली
आहे. येथून पुढे कोणतीही अडचण राहणार नाही. कर्जासाठी कुणापुढे पदर पसरावा लागणार नाही.
इतकी उत्तम परिस्थिती आहे. यंदा १३ लाख मेट्रिक टनाच्या पुढे ऊस गाळप होणे आवश्यक आहे. त्यासाठी सन २०१७-१८ व २०१९ हे दोन्ही गळीत हंगाम नियोजनबद्धरीत्या पार पाडण्याची शपथ सर्वांनी घेतली पाहिजे.
सन २०१०-११मध्ये कारखान्याची स्थिती चांगली होती. त्या वेळी आपण २ हजार ६११ रुपये दर दिला होता. तीन वेळा कारखान्याची गाळप क्षमता वाढविली होती. दुर्दैवाने दुष्काळी स्थिती निर्माण झाली. गाळप कमी व उत्पादन खर्च वाढला होता. सन २०१४मध्ये राजकीय सत्ताबदल झाला.
मागील वर्षी ३१ वर्षांतील नीचांकी गाळप झाले. मात्र जाहीर केल्याप्रमाणे २ हजार ५०५ ऊसदर दिला. कामगारांच्या पगारासाठी वर्षाला १९ कोटी रुपये
लागतात. त्याची तजवीज करून ठेवली होती. तथापि काही बँकांनी जाणीवपूर्वक अडचणी निर्माण केल्या. सन २०१८चे हप्ते बँकांनी २०१७च्या ३१ मार्चमध्ये कपात करून घेतले होते.
सध्या वेळेवर पगार होण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या आहेत. कारखाना क्षेत्रातील उसाला साडेनऊ रिकव्हरी बसते आहे. साडे अकरापर्यंत रिकव्हरी मिळण्यासाठी संचालक मंडळ व आपण सारे प्रयत्न करणार आहोत, असे सांगून ते म्हणाले,
की दररोज १२ हजार टनाचे गाळप होईल अशी तयारी कारखान्याने केली आहे. सूत्रसंचालन शरद
काळे यांनी, तर आभार राहुल जाधव यांनी मानले.

शेतकºयांना एफआरपी पेक्षा ४६३ रुपये जादा

कर्मयोगीने शेतकºयांना एफआरपीपेक्षा ४६३ रुपये जादा दिले आहेत. त्या जादा रकमेवर इन्कम टॅक्स आकारला गेला आहे. सभासदांना तर २ हजार ५०५ रुपयेप्रमाणे पैसे दिले आहेत. या संदर्भात येणाºया अडचणी सर्वांनी एकत्रितपणे सोडविल्या पाहिजेत, असे हर्षवर्धन पाटील म्हणाले.

Web Title:  Karmayogi factory autocomplete: Harshvardhan Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे