उन्हामुळे कलिगंड, खरबुजाला मागणी; भावात वाढ
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 20:15 IST2019-03-31T20:14:54+5:302019-03-31T20:15:39+5:30
उन्हाचा ताप वाढू लागल्याने बाजारात थंडावा देणाऱ्या फळांची आवक वाढली आहे.

उन्हामुळे कलिगंड, खरबुजाला मागणी; भावात वाढ
पुणे : उन्हाचा ताप वाढू लागल्याने बाजारात थंडावा देणाऱ्या फळांची आवक वाढली आहे. मागणी जास्त असल्याने खरबूज, कलिंगडाचे भाव १० टक्क्यांनी वाढले आहेत. तर, मागणी अभावी पेरू, पपई, डाळिंब, सफरचंदच्या भावात १० टक्क्यांनी घट झाली आहे. पाण्याच्या तुटवड्यामुळे डाळिंबाचा दर्जा घसरला आहे. शहरासह उपनगरांतील सरबत विक्रेते तसेच रसाची गुऱ्हाळे यांकडून लिंबाना मागणी होत असल्याने लिंबाच्या गोणीमागे भावात ५० ते १०० रुपयांनी वाढ झाली आहे. इतर सर्व फळांचे भाव गेल्या आठवड्याच्या तुलनेत टिकून आहेत.
मार्केट यार्डमधील फळबाजारात रविवारी (दि. ३१) अननस ५ ट्रक, मोसंबी ५० ते ५५ टन, संत्री ४५ ते ५० टन, डाळिंब २०० टन, पपई १० ते १२ टेम्पो, लिंबे दोन ते तीन हजार गोणी, चिक्कू ३ हजार डाग, पेरु ४०० क्रेटर्स कलिंगड ३५ ते ४० टेम्पो, खरबुज २० ते २५ टेम्पो, सफरचंद ५०० ते ६०० पेटी आणि द्राक्षांची १० टन इतकी आवक झाली, अशी माहिती व्यापा-यांनी दिली.
--
झेंडूच्या फुलांचे दर वाढले
उन्हाळ्यामुळे फुलांची मागणी, दर आणि आवक स्थिर आहे. झेंडूच्या फुलांची आवक कमी झाल्याने दरामध्ये ५ ते १० टक्क्यांची वाढ झाली आहे. सद्य स्थितीत फुलबाजारात कोणत्याच फुलांना मागणी नसल्याने बाजारात मंदी जाणवत आहे़.