अवघ्या दोन वर्षाची चिमुकली वृतिका बासूतकर कलाम वर्ल्ड रेकॉर्डमध्ये
By राजू इनामदार | Updated: November 6, 2023 18:35 IST2023-11-06T18:34:28+5:302023-11-06T18:35:04+5:30
तब्बल ४६ चित्र फक्त एकदा पाहून नंतर त्यांच्या नावांसह ओळखून दाखवली

अवघ्या दोन वर्षाची चिमुकली वृतिका बासूतकर कलाम वर्ल्ड रेकॉर्डमध्ये
पुणे: वय वर्ष अवघे २ असलेली एखादी चिमुरडी किती व कायकाय लक्षात ठेवू शकेल? या प्रश्नांची सगळी अपेक्षित उत्तरे चुकवून वृतिका बासूतकर या मुलीने तब्बल ४६ चित्र फक्त एकदा पाहून नंतर त्यांच्या नावांसह ओळखून दाखवली. तिच्या या असामान्य स्मरणशक्तीचे कौतूक तिला जिनियन चाईल्ड विथ एक्स्पेन्शल ग्रास्पिंग ॲबिलिटीज व रायझिंग स्टार ऑफ इयर २०२३ हे पुरस्कार देण्यात आले. त्याचबरोबर तिचे नाव कलाम वर्ल्ड रेकॉर्ड या विक्रमांच्या पुस्तकांमध्ये नोंद करून घेण्यात आले.
वृतिकाचे आजोबा शशिकांत बासूतकर यांनी सांगितले की घरात सहज म्हणून तिच्याबरोबर बोलताना तिच्यातील स्मरणशक्तीचा हा गूण लक्षात आला. त्यानंतर तिची आई अपर्णा व व वडिल प्रसाद यांनी तिला याचा सराव दिला. आता ती कोणत्याही गोष्टी केवळ एकदा पाहून स्मरणाने त्या ओळखू शकते. श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती विश्वस्त मंडळाच्या वतीने याबद्दल तिचा मंडळाच्या कार्यालयात बोलावून विशेष सत्कार करण्यात आला.