शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

प्रवाशांचा आनंदोत्सव! दिल्ली, कोलकाता, पाटणा, भोपाळसह ६ शहरांना पुण्यातून खासगी रेल्वे

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2021 3:30 PM

देशातील पहिल्या ९० खासगी रेल्वेत पुण्यातून सुटणाऱ्या ६ गाड्यांचा समावेश

ठळक मुद्देभारतीय रेल्वेच्या तीस मिनिटे आधी खासगी रेल्वे सुटणार अन् त्याचा वेगही जास्त असणार

प्रसाद कानडे

पुणे : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी नॅशनल मोनेटायझेशन पाइपलाईन (एमएनपी) जाहीर केले. त्यानुसार विविध क्षेत्रातील सरकारी मालमत्तातील भागीदारी विकून किंवा भाड्याने देऊन केंद्र सरकार ६ लाख कोटी रुपये उभारणार आहेत. यातले १.२ लाख कोटी रुपये रेल्वेच्या खासगीकरणातून उभे राहणार आहेत. यासाठी देशातील चारशे रेल्वे स्थानके, ९० प्रवासी रेल्वे गाड्या, १५ रेल्वे मैदाने आणि २६५ मालधक्के भाड्याने दिले जाणार आहे. ज्या ९० प्रवासी रेल्वे खासगी होणार आहेत. त्यात पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या सहा लांब पल्ल्याच्या गाड्यांचा समावेश आहे.

पुणे-दिल्ली, पुणे-भोपाळ, पुणे-पाटणा, पुणे-हावडा, पुणे-दिब्रूगड आणि पुणे -प्रयागराज या पुण्यातून सुटणाऱ्या सहा गाड्या खासगी होतील. खासगी कंपनीसाठीची निविदा प्रक्रिया लवकरच सुरू होणार आहे. तत्पूर्वीच रेल्वे मंत्रालयाने मार्गांचे नियोजन केले आहे. यासाठी रेल्वेने १२ क्लस्टर जाहीर करताना संबंधित गाड्याचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. खासगी गाड्यांमधला प्रवास अधिक आरामदायी, स्वच्छ आणि आलिशान होणार असल्याचे सांगितले जात आहे. अर्थात त्यासाठी जास्त तिकीट दर मोजण्याची तयारी ठेवावी लागेल.

ह्या गाड्या धावणार ‘खासगी’

१. पुणे-दिल्ली- पुण्याहून रोज संध्याकाळी सहा वाजता सुटेल. दिल्लीला दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजता पोहोचेल. दिल्लीतून ३ वाजून २० मिनिटांनी निघून दुसऱ्या दिवशी सकाळी अकराला पुण्यात पोहोचेल.२. पुणे-भोपाळ - आठवड्यातून तीन दिवस धावेल. सोमवार, गुरुवार आणि शनिवारी दुपारी ३ वाजून २० मिनिटांनी पुण्यातून निघेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे सव्वाचार वाजता भोपाळला पोहोचेल. बुधवार, रविवार व शुक्रवारी भोपाळहून सायंकाळी ५ वाजून ५५ मिनिटांनी निघून दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजून २० मिनिटांनी पुण्यात पोहोचेल.३. पुणे-पाटणा-आठवड्यातून दोन दिवस धावेल. पुण्याहून सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी निघेल. दुसऱ्या दिवशी दुपारी दीड वाजता पाटण्याला पोहोचेल. पाटण्याहून रात्री ११ वाजून १० मिनिटांनी निघेल आणि पुण्याला तिसऱ्या दिवशी पहाटे सव्वापाच वाजता पोहोचेल.४. पुणे-हावडा-आठवड्यातून दोन दिवस धावेल. पुण्यातून गुरुवारी व रविवारी सकाळी ६ वाजून ५५ मिनिटांनी निघेल. दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजता हावडा येथे पोहोचेल. हावडा येथून मंगळवारी, शुक्रवारी सायंकाळी ६ वाजून १० मिनिटांनी निघून दुसऱ्या दिवशी रात्री ८ वाजून ५५ मिनिटांनी पुण्यात पोहोचेल.५. पुणे-प्रयागराज-आठवड्यातून तीन दिवस धावेल. पुण्यातून दर मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी रात्री १० वाजून २० मिनिटांनी निघेल. प्रयगराजला दुसऱ्या दिवशी रात्री ९ वाजता पोहोचेल. प्रयागराज स्थानकावरून दर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी रात्री १० वाजून २० मिनिटांनी सुटेल आणि पुण्यात दुसऱ्या दिवशी रात्री ९ वाजता पोहचेल.६ पुणे-दिब्रूगड (आसाम) - आठवड्यातून एकदा धावेल. पुण्यातून दर रविवारी सकाळी साडेदहा वाजता निघून दिब्रूगडला बुधवारी सकाळी साडेपाच वाजता पोहोचेल. दिब्रूगडगून बुधवारी सकाळी पावणेदहा वाजता सुटून दोन दिवसांनी पहाटे साडेचार वाजता पुण्यात पोहोचेल.

तीस मिनिटे आधी, अधिक वेगानेही

पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या ज्या सहा रेल्वे मार्गांची निवड केली आहे, त्यात दिल्ली व हावडासाठी सर्वाधिक ‘वेटिंग’ असते. या मार्गावर प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असल्याने भरपूर प्रवासी मिळून उत्पन्न वाढेल या आशेने खासगीकरणासाठी या मार्गांची निवड केली आहे. भारतीय रेल्वेच्या तीस मिनिटे आधी खासगी रेल्वे सुटेल. तसेच त्याचा वेग जास्त असेल. पुण्याहून दिब्रूगड या मार्गावर तर पहिल्यांदाच थेट रेल्वे धावणार आहे.

टॅग्स :PuneपुणेIndiaभारतdelhiदिल्लीkolkata-uttar-pcकोलकाता उत्तरbhopal-pcभोपाळrailwayरेल्वे