शहरं
Join us  
Trending Stories
1
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
2
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
3
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
4
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
5
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
6
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
7
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
8
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
9
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
10
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
11
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
12
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
13
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
15
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
16
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
17
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
18
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
19
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
20
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा

"अजितदादा, पालकमंत्री या नात्याने पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूवर काही बोलाल का?"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2020 2:28 PM

पुण्यातील आरोग्य यंत्रणांमधील सावळा गोंधळ सुरूच असून कोरोनाबाधितांचा जीव टांगणीलाच असल्याचे सिद्ध

पुणे : मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयात आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा जनता दरबार होता. हा दरबार संपल्यानंतर यावेळी उपस्थित पत्रकारांनी पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूबाबत पालकमंत्री या नात्याने प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, मात्र पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर न देताच अजितदादा निघून गेले. त्यावेळी कार्यकर्त्यांकडून अजितदादा आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषणाबाजी सुरु होत्या.अजित पवार यांच्या असंवेदनशीलतेवर चर्चा सुरू आहे.

वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर यांचे कोरोनावर वेळेवर उपचार न मिळाल्याने बुधवारी( दि.२) पहाटे निधन झाले. ते ४२ वर्षांचे होते. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पुण्यातील वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी यांनी मोठ्या धुमधडाक्यात पुण्यातील जम्बो कोविड सेंटरचे उद्घाटन केले. त्यानंतर कोविडच्या रुग्णांना वेळेवर उपचार मिळतील असेही सांगितले होते. मात्र , तरीदेखील आरोग्य यंत्रणांमधील सावळा गोंधळ सुरूच असून कोरोनाबाधितांचा जीव टांगणीलाच असल्याचे सिद्ध झाले. पुण्यातील आरोग्य यंत्रणांमधील समन्वयाचा अभाव आणि प्रशासकीय पातळीवरची दिरंगाई याचा फटका एका पत्रकाराला बसला. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे पुण्यातील पत्रकार रायकर यांना आपला जीव गमवावा लागला.

रायकर यांना २० ऑगस्टला थंडी आणि तापाचा त्रास सुरू झाला.त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन उपचार सुरू केले. त्यानंतर २७ ऑगस्टला त्यांनी कोरोना चाचणी पण केली जी निगेटिव्ह आली. दुसऱ्या दिवशी म्हणजे २८ ऑगस्टला रायकर हे त्यांच्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव गावी गेले. मात्र तिथेही त्यांचा त्रास सुरूच राहिला.त्यामुळे त्यांनी कोपरगावमधे अँटिजेन टेस्ट केली तिचा अहवाल पॉझिटिव्ह आला. 

त्यानंतर रविवारी ३० जुलैला रात्री त्यांना रुग्णवाहिका उपचारांसाठी पुण्यातील जम्बो हॉस्पिटलमधे भरती केले. तिथे त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र त्यांची तब्येतीमध्ये सुधारणा होत नव्हती. मंगळवारी त्यांची ऑक्सिजनपातळी खूपच खालावली होती.त्यांना जम्बो हॉस्पिटलममधून दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यासाठी कार्डिॲक अँम्ब्युलन्सची गरज होती. पण ती रुग्णवाहिका मिळवण्यासाठी मंगळवारी रात्री प्रयत्न सुरू होते . त्यानंतर एक रुग्णवाहिका जम्बो हॉस्पिटलला पोहचली पण त्यामधील व्हेंटिलेटर खराब झाला असल्याचे  सांगण्यात आले. दुसरी रग्णवाहिका मिळाली पण त्यात डॉक्टरच उपलब्ध नव्हते. तोपर्यंत बारा सव्वाबारा वाजून गेले होते. पहाटे चारच्या सुमारास रुग्णवाहिका मिळवण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू करण्यात आले. पण तोपर्यंत पांडुरंगची प्रकृती आणखी खालावली होती. दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलकडून पहाटे पाच वाजता रुग्णवाहिका उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आणि आयसीयुमधील डॉक्टरांचा आम्ही निघतो आहोत असा फोन आला. पत्रकार आणि त्याचे नातेवाईक जंबो हॉस्पिटलला पोहचले आणि डॉक्टरांनी साडेपाच वाजता त्याचं निधन झाल्याचं सांगितलं. थोड्याच वेळात  रुग्णवाहिका जम्बो हॉस्पिटलला पोहचली पण तोपर्यंत  उशीर झाला होता. यंत्रणांमधील समन्वयाचा अभावामुळे रायकर यांना आपला जीव गमवावा लागला.

टॅग्स :PuneपुणेCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसhospitalहॉस्पिटलDeathमृत्यूJournalistपत्रकार