शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

Jejuri Agitation: जेजुरी संतप्त, नवीन विश्वस्तांना जेजुरीकरांचा विरोध, आंदोलनाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2023 15:30 IST

देवकार्य माहिती असणाऱ्या जेजुरीतील स्थानिकांची निवड करावी अशी ग्रामस्थांची मागणी

जेजुरी : महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या तीर्थक्षेत्र जेजुरीच्या श्री खंडोबा देवाच्या श्री मार्तंड देवसंस्थानच्या विश्वस्तपदांची नुकतीच नियुक्ती झाली. यात  ७ पैकी केवळ एकच स्थानिक विश्वस्ताची निवड करण्यात आली, तर सहा जण बाहेरगावचे विश्वस्त नेमण्यात आले. या निवडीबाबत जेजुरीत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. ग्रामस्थांच्या भावना सर्वप्रथम दैनिक लोकमत ने व्यक्त केल्या होत्या. ग्रामस्थांच्या तीव्र भावना आज ही व्यक्त होत आहेत. 

 नवीन विश्वस्त निवडीच्या  निषेधार्थ जेजुरी ग्रामस्थांच्या वतीने  आज शुक्रवार( दि २६) पासून विविध आंदोलनाला सुरुवात झाली आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या श्री खंडोबा मंदिराचे व्यवस्थापन पाहणाऱ्या श्री मार्तंड देवसंस्थानच्या विश्वस्तांची निवड प्रक्रिया गेली सहा महिने सुरु होती. या विश्वस्त पदावर देवाची महती, देवकार्य माहिती असणाऱ्या जेजुरीतील स्थानिकांची निवड करावी अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली होती. चार दिवसांपूर्वी पुणे धर्मादाय आयुक्त कार्यालयाने नवीन विश्वस्त मंडळ जाहीर केले. यात बाहेरील गावातील सहा व केवळ एकच स्थानिक विश्वत निवडला गेला.

बाहेरील विश्वस्त नियुक्तीच्या निषेधार्थ गुरुवारी( दि २५) रोजी ग्रामस्थांची येथील ऐतिहासिक छत्री मंदिर प्रांगणात बैठक होवून यात आंदोलनाचा इशारा देण्यात आला. आंदोलन उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. आज सकाळी ११ वाजता डॉ बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात प्रथम रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यांनतर जेजुरी शहरातून मोर्चा काढण्यात आला.

जेजुरी गडाच्या पायथ्याशी निषेध व्यक्त करून घोषणा देण्यात आल्या. त्यांनतर श्री मार्तंड देवसंस्थानच्या मल्हार भक्त निवासासमोर चक्री उपोषण सुरु करण्यात आले. या आंदोलनात राजकीय मतभेद बाजूला ठेवून सर्वपक्षीय कार्यकर्ते, पालखी सोहळा समिती, आजीमाजी विश्वस्त, नगरसेवक व मोठ्या संख्यने ग्रामस्थ सहभागी होत मार्तंड देव संस्थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र जगताप यांना निवडी चा निषेध करून आंदोलनाबाबत लेखी निवेदन दिले आहे. 

टॅग्स :PuneपुणेJejuriजेजुरीagitationआंदोलनTempleमंदिरSocialसामाजिक