पुणे-नाशिक मार्गावर जीप-कारची धडक

By Admin | Updated: August 3, 2015 04:26 IST2015-08-03T04:26:21+5:302015-08-03T04:26:21+5:30

पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर जीप व कार या दोन वाहनांमध्ये कळंब गावाच्या हद्दीत रविवारी सकाळी दहा वाजता अपघात झाला

Jeep-car hit the Pune-Nashik road | पुणे-नाशिक मार्गावर जीप-कारची धडक

पुणे-नाशिक मार्गावर जीप-कारची धडक

मंचर : पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर जीप व कार या दोन वाहनांमध्ये कळंब गावाच्या हद्दीत रविवारी सकाळी दहा वाजता अपघात झाला. या अपघातामध्ये आठ जण जखमी झाले. मंचर पोलिसांनी फियाट कारचालकाच्या विरोधात हयगयीने वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत मंचर पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे, कार भीमराव शामराव पाटील (रा. पिंपळे गुरव) हे घेऊन नाशिकच्या दिशेने जात होते. फियाट कार हयगयीने चालवून साईडपट्टीच्या खाली उतरवून पुन्हा मूळ रस्त्यावर पाटील यांनी घेतली. त्या वेळी समोरून आलेल्या जीपला कारने धडक दिली. संकेत रामदास थोरात यांनी मंचर पोलिसांत फिर्याद दिली. भीमराव शामराव पाटील यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. तपास युवराज भोजणे करत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Jeep-car hit the Pune-Nashik road